एक्स्प्लोर

Eknath Shinde Maharashtra New CM : दरेगावचा पठ्ठ्या मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंच्या रुपाने साताऱ्याला चौथ्यांदा बहुमान!

Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Maharashtra New CM) महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दरेगावसारख्या छोट्याशा गावातून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास अचंबित करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने साताऱ्याला चौथ्यांदा मुख्यमंत्री मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याआधी यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या सातारकरांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. आता एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) रुपाने चौथा मुख्यमंत्री मिळाला आहे.  

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना हाताशी तर बंडखोरी केली. त्यानंतर आता भाजपशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. अखेर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताली अशी घोषणा केली. त्यानंतर साताऱ्यामध्ये एकच जल्लोष सुरु झाला. कारण सातऱ्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्राला चौथ्यांदा मिळाला. पाहूयात साताऱ्यातील नेत्यांनी याआधी कुणी कुणी कधी मुख्यमंत्रिपद भूषवलेय. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांचं वजन राहिलेय. यशवंतराव चव्हाण यामध्ये अग्रभागी आहेत. त्यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते त्यांचे मुळगाव कलेढोण (ता. खटाव) असून ते बॅरिस्टर होते. अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर अल्पकाळासाठी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात कराडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर आता जावळी तालुक्यातील दरेगावचे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत.

साताऱ्याचे यशवंतराव चव्हाण यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 या काळात मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. त्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 1960 ते 1962 काळात संधी लाभली. त्यानंतर कलेढोण (ता.खटाव) येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना संधी मिळाली. अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर भोसल्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. त्यांनंतर 2010 ते 2014 पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लाभली.  आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. 

हे देखील वाचा -

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget