Ideas of India 2023 : 2019 ची चूक सुधारण्यासाठी मुख्यमंत्री झालो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ideas of India 2023 : एबीपीच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा रोडमॅप कसा असणार याबाबत सांगितले.
![Ideas of India 2023 : 2019 ची चूक सुधारण्यासाठी मुख्यमंत्री झालो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Maharashtra Chief Minister Eknath Shinde discusses Maharashtra Roadmap at ABP Ideas of India 2023 event Ideas of India 2023 : 2019 ची चूक सुधारण्यासाठी मुख्यमंत्री झालो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/7bd771949edcd7963e4eb671d5f43143_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ideas of India 2023 : "2019 साली शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत स्वार्थी आणि लालची भावनेने युती तोडून सरकार स्थापन केले. 2019 ला झालेली चूक सुधारायची होती. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मला मुख्यमंत्री देखील व्हायचे नव्हते. परंतु, 2019 ची चूक सुधारण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि मी मुख्यमंत्री झालो, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. एबीपीच्या आयडियाज ऑफ इंडिया (Ideas of India 2023) समिट 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा रोडमॅप कसा असणार याबाबत सांगितले.
"आज आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. परंतु, आरोप कोणीही करेल. 40 आमदार आणि 12 खासदार आमच्यासोबत का आले याचा यांनी विचार केला पाहिजे. आमचे पक्षप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांची पायामल्ली करत असल्याने आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. या पक्षात माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत. कोण काय विचारते यावर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.
'फेसबुकवरून संवाद साधून राज्याचा विकास होत नसतो'
"महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्य वेगाने प्रगती करत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्टाचं मोठं योगदान आहे. राज्यात अनेक प्रकल्प नव्याने सुरू केले आहेत. केंद्र सरकारसोबत हातात हात घालून काम करत आहोत. केंद्र सरकारसोबत योग्य पद्धतीने संवाद साधल्यानंतर ते राज्यांना मदत करतात. त्यासाठी घरातून बाहेर पडलं पाहिजे. घरातून फेसबुकवरून संवाद साधून विकास होत नाही, असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
'राज्यात पाच हजार किलोमीटरचे रस्ते तयार करणार'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण या सारख्या सुविधा नागरिकांना दिल्या तर राज्याचा विकास होईल. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. समृद्धी महामार्गासारखे मोठे रोड आम्ही तयार करत आहोत. दळणवळणाच्या सुविधा राज्यात वाढवत आहोत. राज्यात पाच हजार किलोमीटरचे महामार्ग तयार करत आहोत. यामुळे वेळीची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
'देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे'
मुख्यमंत्र्यांना आपण उपमुख्यमंत्री केलं या प्रश्नाचे उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आदेश मानून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पक्षाचा आदेश पाळायला खूप मोठं मन लागतं. त्यांनी पक्षाचा आदेश पाळला. त्यांचं मन खूप मोठं आहे."
दरम्यान, 2024 ला तुम्हीच मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सांगितले की, "2024 ला मुख्यमंत्री होईल का नाही माहिती नाही. ते तर जनतेच्या हातात आहे. आम्ही आमचं काम करत राहू. राज्याचा विकास करत राहू."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)