एक्स्प्लोर
Advertisement
राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेले 10 निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पुण्यातील उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासह एकूण दहा निर्णय घेण्यात आले आहेत, त्यावर एक नजर
- राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषी पंपासाठी 12 तासांचा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचा निर्णय.
- पुणे शहराच्या उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय.
- कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.
- शिर्डी येथील “शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट” या विमानतळाचे नामकरण “श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट”म्हणजेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय.
- नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयांतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी पद निर्मितीस मान्यता.
- राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मंजुरी.
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये वेळोवेळी वाढविण्यात आलेल्या लाभांना मंत्रिमंडळाची मान्यता.
- कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीच्या अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याचा निर्णय.
- कंपनी विलिनीकरण किंवा निर्विलिनीकरणाचे आदेश व प्रमाणपत्रांवर मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.
- महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियमात सुधारणा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
विश्व
राजकारण
Advertisement