Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: महाराष्ट्राच्या गावाखेड्यातील आणि देश-विदेशातील तसेच, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE: महाराष्ट्राच्या गावाखेड्यातील आणि देश-विदेशातील तसेच, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Nepal Protest : नेपाळमध्ये राजेशाही कशी संपली? राजघराण्याच्या लोकांना गोळ्या कुणी घातल्या? जाणून घ्या Gen Z आंदोलनाच्या आधीचा इतिहास
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये (Nepal) सध्या मोठा गोंधळ सुरू असून त्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. बालेन शाह हे नेपाळच्या अंतरिम सरकारचे नवे प्रतिनिधी असतील. सध्या लोकशाही मार्गाने या देशात सत्तांतर होत असलं तरी एकेकाळी, जवळपास 250 वर्षे शाह वंशाची (Shah Dynasty) राजेशाही (Monarchy) सुरू होती. एका भयानक नरसंहारामुळे (Royal Massacre) नेपाळच्या राजशाही परंपरेचा पाया हादरला आणि अखेरीस ती संपुष्टात आली.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करा, पण शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या माथी नको, राजू शेट्टींनी घेतली गडकरींची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज केंद्रीय मंत्री नितन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात चर्चा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी करावा. तसेच राज्य सरकारवर पडणारा शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पण शक्तिपीठ महामार्ग नको असे शेट्टी म्हणाले.
Prithvi Shaw Sapna Gill Case: क्रिकेट पटू पृथ्वी शॉ याला दंड, महिलेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी 100 रुपयांचा दंड
Prithvi Shaw Sapna Gill Case: क्रिकेट पटू पृथ्वी शॉ याला दंड
समाज माध्यमांवर प्रभावक महिलेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारी प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने सुनावली शिक्षा
पृथ्वी शॉला 100 रुपयांचा दंड
आदेश देऊनही नोटीसला उत्तर दिले नसल्याने न्यायालयाची कारवाई
अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झाला होता वाद
त्यानंतर या महिलेने विनय भंगाची केली होती तक्रार
शॉ याला झालेल्या मारहाणी प्रकरणात त्या महिलेला अटक झाली होती
पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नसल्याने त्यांनी थेट महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती
Solapur Crime: सोलापुरात माजी उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे प्रकरण, कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तिकेविरोधात गुन्हा दाखल
Solapur Crime: सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासुर गावात एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल समोर आली होती. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे मृतदेह असल्याचे समोर आले. या प्रकरणी मृताच्या मेहुण्याने पोलिसात फिर्याद दिली असून कला केंद्रात काम करणाऱ्या एका नर्तिकेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. पूजा गायकवाड असे 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे.
























