एक्स्प्लोर

मोठी बातमी! धनराज शिंदे विधानसभेच्या आखाड्यात? रमेश शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, माढ्यात शिंदे कुटुंबात राजकीय संघर्ष  

जित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेचे (MLA Babandada Shinde) बंधु रमेश शिंदे (Ramesh Shinde) यांनी मुलगा धनराज शिंदे (Dhanraj Shinde) समवेत शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर माढा विधानसभेतील (Madha Vidhansabha) राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेचे (MLA Babandada Shinde) बंधु रमेश शिंदे (Ramesh Shinde) यांनी मुलगा धनराज शिंदे (Dhanraj Shinde) समवेत शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंब॔ईत ही भेट  घेतली आहे. भेटीत तब्बल एक तास चर्चा झाली आहे. 

आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांचे पुत्र धनराज शिंदे माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.  या भेटीनं आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रमेश शिंदे हे आपला मुलगा धनराज शिंदेसाठी विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार

आमदार बबनराव शिंदे हे गेल्या 35 वर्षापासून सलग माढ्या तालुक्याचे आमदार आहेत. साखर कारखाना, बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ हे बबनदादा शिंदे यांच्या ताब्यात आहेत. त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष आहेत. रणजितसिंह शिंदे हे यंदा विधानसभा निवडणुक लढवणार आहेत. त्यांच्याच विरोधात आमदार शिंदेंचे बंधु रमेश  शिदे यांचा मुलगा धनराज शिंदे माढा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. धनराज शिंदे हे तुतारीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. शरद पवार गटाकडून धनराज शिंदे, संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे, शिवाजी कांबळे हे इच्छुक आहेत. तसेच अभिजित पाटील यांच्यासह मिनल साठे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. दरम्यान, शरद पवार हे नेमकं कोणाला तिटीट देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण मागच्या आठवड्यापूर्वीच आमदार बबनदादा शिंदे यांनी पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासह शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. आता लगेच त्यांचे बंधू रमेश शिंदे यांनी देखील पुत्र धनराज शिंदे यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Embed widget