मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा
ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. वाईन शॉप बाहेर होणाऱ्या गर्दीपासून सुटका व्हावी आणि कोव्हिड -19 रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी ही ई - टोकन सुविधा सुरु करण्याच निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केला आहे.
ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिनकोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे.
संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई - टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून दारू खरेदी करु शकणार आहे.
संबंधित बातम्या
- coronvirus | राज्यात आज 1230 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 23,401
- मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Corona Update | देशात आतापर्यंत 20,917 लोक कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के : आरोग्य मंत्रालय
Indian Corona | देशात आतापर्यंत 20,917 लोक कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के - आरोग्य मंत्रालय