एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 1230 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 23,401

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1230 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 23,401आहे. तर दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या चौदा हजारावर गेली आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 20 जण मुंबईचे तर पुण्यातील 3, सोलापूर 5, ठाणे 2, अमरावती ,औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी आणि वर्धा शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. राज्यात आतापर्यंत 868 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 587 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 18 हजार 917 नमुन्यांपैकी 1 लाख 93 हजार 457 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 23,401 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 48 हजार 301 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 15 हजार 192 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 4786 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 23 पुरूष तर 13 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 43रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 36 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 23,401

मृत्यू - 868

मुंबई महानगरपालिका- 14,521 (मृत्यू 528)

ठाणे- 125 (मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 927 (मृत्यू 10)

नवी मुंबई मनपा- 898 (मृत्यू 4)

कल्याण डोंबिवली- 366 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा - 30

भिवंडी, निजामपूर - 32 (मृत्यू 2)

मिरा-भाईंदर- 214 (मृत्यू 2)

पालघर- 37 (मृत्यू 2 )

वसई- विरार- 249(मृत्यू 10)

रायगड- 123 (मृत्यू 1)

पनवेल- 139 (मृत्यू 2)

नाशिक - 60

नाशिक मनपा- 40

मालेगाव मनपा - 596 (मृत्यू 34)

अहमदनगर- 54 (मृत्यू 3)

अहमदनगर मनपा - 9

धुळे - 9 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 45 (मृत्यू 3)

जळगाव- 145 (मृत्यू 12)

जळगाव मनपा- 35(मृत्यू 7)

नंदुरबार - 22 (मृत्यू 2)

पुणे- 166 (मृत्यू 5)

पुणे मनपा- 2476 (मृत्यू 149)

पिंपरी-चिंचवड मनपा- 147 (मृत्यू 4)

सातारा- 121 (मृत्यू 2)

सोलापूर- 9

सोलापूर मनपा- 287 (मृत्यू 16)

कोल्हापूर- 13 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 6

सांगली- 33

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 4 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग-6

रत्नागिरी- 42 (मृत्यू 2)

औरंगाबाद - 93

औरंगाबाद मनपा - 491(मृत्यू 14)

जालना- 14

हिंगोली- 60

परभणी- 1 (मृत्यू 1)

परभणी मनपा-1

लातूर -26 (मृत्यू 1)

लातूर मनपा- 5

उस्मानाबाद-3

बीड - 1

नांदेड - 4

नांदेड मनपा - 41(मृत्यू 4)

अकोला - 18 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 144 (मृत्यू 10)

अमरावती- 5 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 78 (मृत्यू 11)

यवतमाळ- 97

बुलढाणा - 25 (मृत्यू 1)

वाशिम - 1

नागपूर- 2

नागपूर मनपा - 257 (मृत्यू 2)

वर्धा - 1 (मृत्यू 1)

भंडारा - 1

चंद्रपूर -1

चंद्रपूर मनपा - 3

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1256 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 12,027 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 53.71 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

संबंधित बातम्या :

Indian Corona | देशात आतापर्यंत 20,917 लोक कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के - आरोग्य मंत्रालय
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?

व्हिडीओ

Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
Embed widget