एक्स्प्लोर
ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार?
नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे.
मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यांमधल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यासोबतच यावेळी पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे.
थेट सरपंच निवडणुकीचा भाजपाला लाभ
बीड : ३५६ निकाल हाती (भाजपा : २०३)
औरंगाबाद : ९० निकाल हाती (भाजपा : ७२)
अहमदनगर : ११६ निकाल हाती (भाजपा : ७९)
नंदुरबार : २८ निकाल हाती (भाजपा : १७)
जळगाव : १०३ निकाल हाती (भाजपा : ७८)
वाशिम : १२७ निकाल हाती (भाजपा : ८६)
यवतमाळ : ९३ निकाल हाती (भाजपा : ४४)
लातूर : २५० निकाल हाती (भाजपा : १५१)
नंदुरबार
काँग्रेसला मोठा धक्का तर भाजपची मुसंडी, ५१ पैकी ४० ग्रामपंचायतीवर भाजप आघाडीवर, शिवसेनेला एक जागा
मालेगाव निकाल :
सर्व नऊ ग्रामपंचयतींचे निकाल जाहिर, भाजपचे 7 उमेदवार थेट सरपंचपदी, तर शिवसेनेला 2 ठिकाणी यश
दाभाडी, सौंदाणे, मोहपाडा, वजीरखेडे,चौकटपाडे, जाटपाडे, पाटणे या ठिकाणी भाजपाचे सरपंच तर रोंझे आणि टोकडे या ठिकाणी शिवसेनेचे थेट सरपंच विजयी
नाशिक निकाल
मनसेने खात उघडलं, त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या महिरावणी आणि इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव इथे मनसे समर्थकांची सत्ता, मुंढेगावला मनसेचा सरपंच
अकोला निकाल
बाळापूर तालूक्यातील कोळासा ग्रामपंचायत सरपंचपदी शेषराव वानखडे विजयी.भरतपूर ग्रामपंचायत सरपंचपदी श्रीकांत घोगरे विजयी.
अकोला शहरालगतच्या कुंभारी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बंडखोर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजींचं वर्चस्व, ११ पैकी ९ जागांवर विजयी सरपंचपदी संतोष भटकर विजयी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचं वर्चस्व मोडीत
बाळापूर तालूक्यातील मनारखेड ग्रामपंचायतवर शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांचं वर्चस्व, सरपंचपदी संदीप पाटील यांचे बंधू सुरज पाटील. ग्रामपंचायतच्या ९ पैकी ६ जागांवरही कब्जा
बाळापूर निकाल
१) भरतपूर : श्रीकांत घोगरे
२) कोळासा : शेषराव वानखडे
३) मोर्धा : प्रविण पघरमोर
४) मोरझाडी : बाळकृष्ण फुकट
५) मोरगाव सादीजन : राजीव टेकाळे
६) कळंबी महालेश्वर : अंकूश ठाकरे
७) टाकळी खोजबोळ : सचिन टोळवे
८) टाकळी निमकर्दा : जयराम वानखडे
९) कळंबा बुद्रुक : प्रभा बागडे
१०) मनारखेड : सुरज पाटील
११) बारसिंगा : गजानन अवतीरक
१२) सांगवी : महेंद्र सांगोकार
१३) हसनापूर : सुनिल राऊत
१४) कुपटा : राजेश नळकांडे
परभणी निकाल
1 धसाडी - शिंदे मीराबाई 639 विजयी, 2 शिंदे सुनीताबाई 341
2 तट्टूजवला - कदम कमलाबाई 429 विजयी,2 कदम किशनराव 242
3 साडेगाव - भांगे शेषराव 1137 विजयी,2 देवडे भास्कर 1018
4 मिरखेल - कंकूट्टे अनिता 661 विजयी, 2 कंकूट्टे पंचशिला 460
5 सळापुरी - घाटगे सतीश 823 विजयी, 2 जीवनराव घाटगे 548
6 बाभूळगाव- दळवे गणेश 720,2 पाराधे विठ्ठल 619
7 पारवा - तालडे मुंजा 882 विजयी, 2 मुटकुळे उत्तम 601
8 शहापौर - दुगाने मीरा 333 विजयी, 2 हरकल संगीता 304
लातूर
शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना झटका, आशिव ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात, 20 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात
बुलडाणा निकाल
शेगाव तालुक्यात 10 पैकी 4 जागांवर काँग्रेसचा विजय, एक जागा भारिपच्या ताब्यात, 5 जागांचे निकाल बाकी
देऊळगाव राजा तालुका सरपंचपद
राष्ट्रवादी काँग्रेस - 10
भाजपा - 2
काँग्रेस - 2
शिवसेना 2 आणि 3 जागांवर शिवसेना आघाडीवर
संग्रामपूर तालुका
एकूण 22 जागासाठी 2 आधीच बिनविरोध
20 पैकी 3 भाजपा, 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी काँग्रेस
खामगाव तालुका
एक बिनविरोध
15 जागांपैकी 11 जागांवर भाजप विजयी
काँग्रेस 3
भारिप 1
एकूण - 16
नंदुरबार निकाल
काँग्रेस - ६
भाजप - १०
राष्ट्रवादी - १
एकूण - १७ ग्रामपंचायती
काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार, भाजपची 3 ग्रामपंचायतीवरुन 10 ग्रामपंचायतींवर मुसंडी
बीड निकाल
पंकजा मुंडे यांना पुन्हा दणका, गोपीनाथ गड असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात
परळी नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भाजपने कमबॅक केलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील ट्रेंड पाहता धनंजय मुंडे समर्थक आणि पंकजा मुंडे समर्थकांत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे
पुतण्याकडून काकाला धोबीपछाड, नवगण राजूरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात, काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनेलचा धुव्वा, 40 वर्षानंतर झाली निवडणूक
परळीतील निकाल
बेलांबा- गित्ते इंदूबाई
चांदापूर -हनवते भागाबाई
गोवर्धन- जाधव भाग्यश्री
कौडगाव- साबळे ज्ञानोबा
दौडवाडी- दौड लिंबाजी
तळेगाव- मुंडे शांताबाई
कौडगाव- हुडा गव्हाणे दत्तात्रय
गाढे पिपळगाव- सोनवणे वर्षा
खो सावरगाव- दहिफळे वनमाला
पाडळी/हसनाबाद-हजारे शुभांगी भागवत
वाका- खोडके सुधामती साधु
तडोळी-सिरसाट कोंडाबाई राजाभाऊ
कौठळी-आदोडे नवनाथ
मांडेखेल-मुंडे शिवबा ञिंबक
धर्मापुरी-फड अश्विनी गोंविद
पोहनेर-काकडे नितिन नरहरी
कन्हेरवाडी-फड राजाभाऊ
जिरेवाडी-कांदे गोवर्वधन धोंडिराम
लमाण तांडा-राठोड दत्ता सखाराम
नंदागौळ-गित्ते पल्लवी सुंदर
लोणी-देवकते विश्वनाथ
जळगाव निकाल
गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात भाजपने गड राखला
टाकळी - सरपंच - सरला सारंग अहिरे - भाजप
चिलगाव - सरपंच - उस्मान तडवी - राष्ट्रवादी
पलासखेड - सरपंच - अर्चना विकास पाटील
मोहाडी - सरपंच - भावना रामचंद्र पाटील - भाजप
हिंगणे बुद्रुक - सरपंच - शारदा अनिल चौधरी - भाजप
चिंचखेड बुद्रुक - सरपंच - सुरेश शेणफडू पाटील
कोदोली - सरपंच - सुषमा विजेंद्र पाटील - भाजप
रांजणी - सरपंच - चंद्रभागा बाई सपकाळ - भाजप
खादगाव - सरपंच - ज्योती संदीप चौधरी - भाजप
बोदवड तालुका
निमखेड - सरपंच - बनुबाई रमेश सुरंगे,
कोलाडी - सरपंच - वनिता सोपान सुरळकर
धोंडखेड - सरपंच - गीताबाई अरुण माहूरे
वडजी - सरपंच - सुमित्रा ओंकार ठाकरे
चिंचखेड - अनिता लक्ष्मण दांडगे
चोपडा तालुका
गोरगावले खुर्द - सरपंच - छाया सुनील बागुले
संफुले - सरपंच -सुनंदा हिरामण पाटील
हाटेड खुर्द - सरपंच - ज्ञानेश्वर तुकाराम अहिरे
खडगाव - सरपंच - संगीता राजेंद्र सोवे
कासारखेड - सरपंच - भागवत शंकर पाटील -अपक्ष
चिखली बुद्रुक - सरपंच - कासाबाई कौटिक कोळी
चितोळा - सरपंच - सलीमा सलीम तडवी,
चुनचाळे - सरपंच - सुनंदा संजय पाटील
धुळे निकाल
सासूविरुद्धच्या लढाईत सुनेचा विजय. धुळे तालुक्यातील नगांव ग्रामपंचायत सरपंचपदी पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी सासू सुशिला दत्तात्रय भदाणे यांचा पराभव केला.
उर्वरित ग्रामपंचायतचा जाहीर निकाल
सैताळे ग्रामपंचायत - शिवसेना-भाजप-काँग्रेसची तिसरी आघाडी, याच आघाडीचे सरपंचपदाच्या उमेदवार शोभा पंकज वाघ यांचा विजय
नंदाळे खुर्द - सरपंच - मीरा पाटील - काँग्रेस
फागणे - सरपंच - विलास चौधरी
नगांव - सरपंच - ज्ञानज्योती भदाणे - भाजप
जालना निकाल
घनसावंगी तालुका
1) पिरपगवाडी - सरपंच - शकुंतला पाटेकर - राष्ट्रवादी
2) हातडी - सरपंच - राम शिंदे - राष्ट्रवादी
3) दैठणा बु. - सरपंच - रंजना धांडे - राष्ट्रवादी
4) लिंबी- सरपंच - सुनील तौर - राष्ट्रवादी
5) बोलगाव - सरपंच - लक्ष्मण शेळके - राष्ट्रवादी पुरस्कृत
6) सिदेशवर पिंपळगाव - सरपंच - शोभा सातपुते - शिवसेना
जालना- एकूण 224 जागांची मतमोजणी
राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा गड शाबूत, सरपंचपदी भाजपचे भाऊसाहेब भुजंग विजयी
जालना तालुका
१) अंहकार देवळगांव- कैलास सोमधाने
२) मोहाडी - लक्ष्मण पवार
३) ढगी - मारोती केंद्रे
४) धावेडी धार - प्रभाकर इरकर
५) नेखेड़ा सि - बाबुराव खरात
६) पास्ता - बाबुराव प्रकाश इलग
७) माळी पिंपळगांव - रामुलाल पितळे
औरंगाबाद
धनगाव- सरपंच बापूसाहेब कातबने शिवसेना
टाकळी- सरपंच ऊमेदवार महेश सोलाटे विजयी भाजप
धारुर तालुका ग्रामपंचायत निकाल
तेलगाव - राष्ट्रवादी
कोयाळ - भाजप
खामगाव - भाजप
घाटनांदुरमध्ये राष्ट्रवादी विजयी घाटनांदुरमध्ये एकूण 14 सदस्य
अहमदनगर निकाल
तालुक्यात 28 पैकी 27 मतमोजणी पूर्ण, निवडणुकीत 27 सरपंच विजयी तर 260 सदस्य विजयी, एक ठिकाणी सरपंचाचा अर्ज बाद झाला.
महत्त्वाच्या ग्रामपंचायत आणि सरपंच
1) वाळकी - स्वाती बोठे
2) नागरदेवळे - सविता पानमळकर
3) नेप्ती - सुधाकर जाधव
अहमदनगर तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केशव बेरड यांचे पॅनलला धक्का. त्याचबरोबर भाजप आमदार शिवाजी कर्डिले समर्थक मार्केट यार्डचे उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या पत्नी रेश्मा पराभूत
अहमदनगरला श्रीगोंदा तालुक्यात दहा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर, राष्ट्रवादीचा वरचष्मा भाजप म्हणजेच बबनराव पाचपुते यांना धक्का
राष्ट्रवादीच्या ताब्यात सात ग्रामपंचायत तर भाजपला तीन ठिकाणी सरपंचपद, पाचपुतेंचा होमपीचवर वरचष्मा कायम मात्र तालुक्यात आघाडीकडून धोबीपछाड, तालुक्यात दहा पैकी सात जागांवर राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांची बाजी
तर भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे केवळ काष्टीत एकहाती सत्ता तर बेलवंडी सरपंचपद पदरात. माठ गावात भाजपला सरपंचपद
मनमाड निकाल
राज्यमंत्री दादा भूसे यांच्यासाठी प्रतिष्ठची ठरलेल्या दाभाडी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या चारुशीला निकम विजयी
दाभाडी ग्रामपंचायत निवडणूक थेट सरपंचपदी - भाजप
वार्ड क्र. 1 - भाजप - 2 महिला, शिवसेना -1 पुरुष
वार्ड क्र. 2 - भाजप - 1 पुरुष, शिवसेना - 1 महिला
वार्ड. क्र. 3 - शिवसेना - 3
वार्ड. क्र. 4 - भाजप - 3
वार्ड क्र. 5 - भाजप - 3
वार्ड क्र. 6 - भाजप - 3
मालेगाव तालुका
10 ग्रामपंचयतीसाठी निवडणूक, त्यातील मोहपाडा ही ग्रामपंचायत बिनविरोध, 9 ग्रामपंचयतीसाठी निवडणुका होऊन भाजपला 7 तर शिवसेनेला 3 मिळाल्या.
रोंझे, टोकडे आणि निबायती या जागा शिवसेनेकडे तर दाभाडी, सौंदाणे, पाटणे, वजीरखेडे, चौकटपाडे, जाटपाडे, मोहपाडा जागा भाजपला
--------------
मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यांमधल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. यासोबतच यावेळी पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे.
8 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान
नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्य़ांमधील एकूण 3131 जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं.
नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होईल.
पहिल्या टप्प्यातील 3 हजार 884 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी मतदान
जिल्हा जागा
नाशिक 150
धुळे 96
जळगाव 101
नंदुरबार 42
अहमदनगर 194
औरंगाबाद 196
बीड 655
नांदेड 142
परभणी 126
जालना 221
लातूर 324
हिंगोली 46
अकोला 247
यवतमाळ 80
वाशिम 254
बुलडाणा 257
एकूण 3131
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement