एक्स्प्लोर
LIVE : 'ओखी' वादळ मुंबई किनाऱ्यापासून 200 किमी अंतरावर
मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळत आहे.
LIVE UPDATE :
- ओखी चक्रीवादळ मुंबई समुद्रकिनाऱ्यापासून 200 किमी अंतरावर
- शिवाजी पार्कातील दूरवस्थेबद्दल गायक नंदेश उमप यांची नाराजी, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पीकर लावण्याची विनंती
- महापरिनिर्वाणदिनावरही ओखी वादळाचं सावट, पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल, महापालिकेच्या 70 शाळांमध्ये भीमसैनिकांच्या राहण्याची सोय
- समुद्रातील उधाणामुळे जाळी, दोरी, शिसे वाहून गेल्याने सिंधुदुर्गात मच्छिमारांचं लाखोंचं नुकसान, तर वेंगुर्ल्यात आठ नौका बुडाल्या
- ओखीच्या प्रभावामुळे मुंबईत दुपारनंतर पाऊस आणि वाऱ्याचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा
- विरार : पावसाचा मच्छिमारांना फटका, अर्नाळा बीच आणि अर्नाळा किल्ल्यातील वाळत घातलेली लाखो रुपयांची सुकी मच्छी वाहून गेली
- ओखी वादळाचा तडाखा : दुपारी 3 नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
- 4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये! - आपत्ती व्यवस्थापन विभागाचं आवाहन
- https://twitter.com/CMOMaharashtra/status/937559643173384193
- ओखी वादळामुळे कोसळणाऱ्या मध्यम सरीच्या पावसात मुंबईत कामं सुरु असलेल्या रस्त्यांची चाळण, मुंबई उच्च न्यायालयासमोरील मुख्य चौकात खड्डेच खड्डे
- रत्नागिरी - लाटांच्या तडाख्याने गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला
- मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात झाड कोसळल्याने वाहतूक मंदावली, दोन जेसीबीच्या मदतीने झाड बाजूला करण्याचं काम सुरु
- दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला, दादर, सीएसटी , वरळी, परळ भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी पावसाचा वाहतुकीवर परिणाम
- 24 तासातील पावसाची नोंद सांताक्रूझ वेधशाळा : 22 मिमी कुलाबा वेधशाळा : 23 मिमी अलिबाग : 21 मिमी ठाणे : 14 मिमी डहाणू : 13 मिमी माथेरान : 14 मिमी पुणे : 3 मिमी महाबळेश्वर : 4 मिमी सातारा : 4 मिमी
- मरिन ड्राईव्हवरचा आढावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement