एक्स्प्लोर
Advertisement
लातुरात डुकराच्या हल्ल्यात पाच वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी
लातुरात डुकरांचा उपद्रव वाढल्याची तक्रार अनेकजण वारंवार करत आहेत. डुकरं समोर दिसली तरी अंगावर येत असल्याचं अनेक जण सांगतात
लातूर : लातूरमध्ये डुकराने एका चिमुरडीचे लचके तोडण्याचे प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षांच्या पल्लवीची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
लातूरच्या दीपज्योती नगरमध्ये राहणारी पल्लवी परदेशी डुकराच्या हल्ल्याला बळी पडली. सकाळी पल्लवी दुकानात निघाली होती. आई घरातील कामांमध्ये, तर वडील कामावर जाण्याच्या गडबडीत असताना अचानक आरडा-ओरडा ऐकू आला. घराबाहेर धाव घेतल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.
डुकराने पल्लवीला अक्षरशः खाण्याचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात धाव घेऊन तिच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. सध्या पल्लवीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
लातुरात डुकरांचा उपद्रव वाढल्याची तक्रार अनेकजण वारंवार करत आहेत. डुकरं समोर दिसली तरी अंगावर येत असल्याचं अनेक जण सांगतात. पल्लवीसोबत घडलेली दुर्घटना म्हणजे शहरातील वाढता कचरा, महापालिकेचा बेजबाबदारपणा अशा अनेक समस्यांचं अपत्य आहे. त्यामुळे या प्रश्नावर वेळीच उपाय शोधणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement