एक्स्प्लोर
शेजारच्या विवाहितेची हत्या, सपासप वार करणारा 16 वर्षीय मुलगा बेशुद्ध
यावेळी त्याने बेसावध पूजा यांच्यावर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. मुलाने पूजा महाडिक यांच्या मुलीसमोरच हल्ला केला.
कोल्हापूर : कोल्हापुरात एका महिलेची तिच्या शेजारीच राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची घटना घडली आहे. पूजा रुपेश महाडिक (35 वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.
शास्त्रीनगरमधील द पॅराडाईज अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर पूजा महाडिक कुटुंबसोबत राहत होत्या. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास शेजारच्या फ्लॅटमधील 16 वर्षीय मुलासोबत पूजा महाडिक यांचा वाद झाला. हा वाद शांत झाल्यानंतर संध्याकाळी आरोपी मुलगा क्लासला जातो असं सांगून गॅलरीतून महाडिक यांच्या फ्लॅटमध्ये घुसला.
यावेळी त्याने बेसावध पूजा यांच्यावर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. मुलाने पूजा महाडिक यांच्या मुलीसमोरच हल्ला केला. पूजा यांचा प्रतिकार अयशस्वी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर मुलगाही तिथेच बेशुद्ध झाला. रुग्णालयात उपचार करुन, शुद्धीत आल्यावर त्याता ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement