एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘सॉरी...मला माफ करा, मी चोरी करतोय’
कोल्हापूर: ‘सॉरी...मला माफ करा, मी चोरी करतोय,’ अशी चिठ्ठी लिहून एका चोराने धूम ठोकली. या चोरट्याने कोल्हापुरातील मंगळवार पेठेत, पाण्याच्या खजिन्याजवळील पशूसंवर्धन कार्यालयात चोरी केली. या चिठ्ठीची चर्चा सध्या कोल्हापुरात जोरदार सुरु आहे.
पाण्याच्या खजिना परिसरात पशूसंवर्धन विभाचं मुख्य कार्यालय आहे. शनिवारी संध्याकाळी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या घरी निघून गेले. रविवारी एक चोर या कार्यालयात शिरला.
आता शासकीय कार्यालयात त्या चोराला काय मिळणार? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हा प्रश्न चोरालाही पडला असावा आणि म्हणून त्याने या कार्यालयातील तीन संगणक, झेरॉक्स मशिन असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला.
आता केवळ हा चोर चोरी करुन थांबला नाही, तर त्याने या कार्यालयातील एका टेबलवर ‘सॉरी...मला माफ करा, मी चोरी करतोय,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
सोमवारी कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
चोरीची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ धाव घेत पंचमाना केला, आणि चोराने लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली. गेल्या 20 वर्षात असा चोर पाहिला नसल्याचं, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ही चोरी एखाद्या गरजू विद्यार्थानं केली आहे का? असा संशय पोलिसांना आहे.
या चिठ्ठीत या चोराने माफी तर मागितली आहेच, मात्र त्याखाली पुढील 5 वर्षांनी परत करेन, असंही लिहिलं आहे. त्यामुळं अता पोलिसही ही चिठ्ठी वाचून आवाक झाले आहेत.
सध्या पोलिस चोरी करुन माफी मागणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत, मात्र या चिठ्ठीची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
क्राईम
क्रीडा
Advertisement