एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा लांबणीवर
विमान सेवा देणाऱ्या एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूर: उडाण सेवेअंतर्गत सुरु होणाऱ्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. येत्या रविवारी 24 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे ती लांबणीवर पडली आहे.
विमान सेवा देणाऱ्या एअर डेक्कनच्या व्यवस्थापनाने आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्याची मागणी केली आहे. ती मंजूर झाल्यास मुंबई - कोल्हापूर विमानसेवा देणे शक्य होईल अशी अट घातली आहे.
त्यामुळे ही सेवा आठवडाभर तरी लांबणीवर पडली आहे.
विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बैठक झाली. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जेव्हीके कंपनीने अद्यापही वेळेचा स्लॉट दिलेला नाही, त्यामुळे विमानसेवा सुरु होण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
वेळापत्रकही ठरलं होतं
- दरम्यान, कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचं वेळापत्रकही जाहीर झालं होतं. त्यानुसार
- कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरु होईल.
- दर मंगळवार, बुधवार, रविवार अशी ही विमानसेवा असेल
- मुंबई ते कोल्हापूर दुपारी १:१५ वाजता विमान असेल, ते दुपारी 2.30 वा. कोल्हापूरला पोहोचेल.
- त्याच दिवशी कोल्हापूर ते मुंबई दुपारी ३:२५ वाजता : मुंबईकडे निघेल, मग ते विमान दुपारी ४:४० वाजता मुंबईत पोहोचेल.
- नांदेड- मुंबई – (जून- 2017)
- नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)
- नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)
- कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
- सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement