एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुर्धर आजार असलेल्या अजयला वाचवण्यासाठी मित्रांची अनोखी मदत
कोल्हापूर : एखादा आजार कुणाची परिस्थिती पाहून येत नाही. कोल्हापुरातील एका तरुणाला दुर्धर आजार झाला आहे. त्याच्या उपचाराचा दिवसाचा खर्च जवळपास 1800 रुपये इतका आहे. कुटुंबीयांना हा खर्च पेलवणारा नाही. त्यामुळे मित्राला वाचवण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेऊन एक नाटक बसवलं आहे. या नाटकाच्या प्रयोगातून मिळणारी रक्कम त्या तरुणाला दिली जाणार आहे.
कोल्हापुरातील वि.स खांडेकर प्रशालेत अकरावीत शिकणाऱ्या अजय जाधव या विद्यार्थ्याला ग्रोथ हार्मोन्स डिफिशियन्सीचा आजार आहे. त्यामुळे त्याची शरीराची आणि बुद्धीची वाढ खुंटली आहे.
डॉक्टरांनी सुरुवातीला गोळ्या-औषधं दिलं. मात्र त्याला इंजेक्शनसह 1800 रुपयांचा खर्च आहे. परंतु रोजच्या उपचारासाठी होणारा खर्च अजयच्या कुटुंबीयांना परवडणारा नाही. त्यामुळे एकाच वर्गात शिकणारे अजयचे मित्र त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
मात्र फारशी मदत गोळा होऊ शकत नसल्याचं लक्षात येताच प्रतिज्ञा नाट्य संस्थेच्या वतीने 'मम्मी डॅडी' नावाचं नाटक बसवलं आहे. 'मम्मी डॅडी' नाटकाच्या प्रयोगातून गोळा होणारी रक्कम अजयच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे, असं मित्रांनी सांगितलं.
एका नाटकाच्या प्रयोगातून मिळालेल्या मदतीमुळे काही दिवस अजयच्या उपचाराचा खर्च भागेल. मात्र सलग चार वर्ष हा खर्च कसा भागवणार असा प्रश्न अजयच्या आई-वडिलांना सतावत आहे. कारण प्रत्येक गोष्टीचं नाटक होतं, पण पैशाचं नाटक करता येत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement