एक्स्प्लोर

कोण आहे समित ठक्कर? ज्याला पंतप्रधान करतात फॉलो, ठाकरे पितापुत्रांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळं अटक

आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे. कोण आहे हा समित ठक्कर ज्याला पंतप्रधान मोदी देखील ट्विटरवर फॉलो करतात.

नागपूर : पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे.  आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत. अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी त्याची पाठराखण केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून खासकरून ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खाजगी टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे.

कोण आहे समित ठक्कर

  • 32 वर्षांचा समित ठक्कर ट्विटरवर प्रचंड सक्रिय राहणारा नागपूरचा तरुण आहे
  • नागपूरच्या व्हिएमवी कॉलेज मधून बीकॉमचे शिक्षण घेणारा समित आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे.
  • त्याचे ट्विटरवर 60 हजार फॉलोवर आहेत, त्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे.
  • समित ठक्करचे कुटुंब नागपूरच्या वाथोडा भागातील व्यवसायिक कुटुंब असून सामान्य मध्यमवर्गीय आर्थिक स्थिती असलेले हे कुटुंब आहे.
  • ठक्कर कुटुंबाचे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून समीत ही याच व्यवसायात सहभागी आहे
  • या शिवाय ठक्कर कुटुंब अनेक सामाजिक उपक्रमात खासकरून मुक्या जखमी जनावरांच्या सेवेसाठीच्या कामात सहभागी होत असतो.
  • समित उघडरीत्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नसला तरी शिवसेनेने समित भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आणि आयटी सेलचा पदाधिकारी असल्याचा दावा केला आहे. तर भाजप ने तो आमचा कार्यकर्ता नाही असा दावा केला आहे.
  • समितचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.

महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट

नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी ऑगस्ट महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दिली होती. समित ठक्कर ट्विटरच्या माध्यमातून सतत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करतो. धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर ट्विट करतो, असे आरोप शिवसैनिकांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी  गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलीस समित ठक्करचा शोध घेत असताना समुतला काही अटींवर न्यायालयातून दिलासा मिळत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं.

कोण आहे समित ठक्कर? ज्याला पंतप्रधान करतात फॉलो, ठाकरे पितापुत्रांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळं अटक

मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा समित ठक्करच्या ट्विटर अकाउंटवरुन राज्य सरकार आणि शिवसेनेविरोधात टीका सुरु झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.  शनिवारी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने समित ठक्करला राजकोटमधून अटक केली. त्याला ट्रांजिट रिमांडवर नागपूरला आणण्यात आले असून आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

ट्विटरवर समित ठक्करचे हजारो फॉलोवर्स असून सध्या ती संख्या 60 हजारांच्या घरात आहे. तर भाजपचे अनेक मात्तबर नेते सुद्धा समित ठक्करला ट्विटर वर फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात त्याचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

आता त्याच समीत ठक्करला पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप दरम्यान राजकीय कलगीतुरा वाढण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवसांपासून #रिलीजसमितठक्कर  ट्रेंड होत आहे. तसेच अनेक भाजप नेते हा हॅशटॅग वापरून समित ठक्करला मुक्त करण्यात यावे असे ट्विट करत आहेत. दरम्यान, नागपुरात शिवसैनिकांनी समित ठक्करला अटक झाल्याचा आनंद व्यक्त करत महाराष्ट्र पोलिसांना धन्यवाद दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget