आम्ही भक्त मल्हारीचे... जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा; राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी
Somvati Amavasya Yatra 2023: जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 13 नोव्हेंबरला भरली आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे.
Khandoba Somvati Amavasya Yatra: महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची (Khandoba Mandir) जेजुरी (Jejuri) भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत. तर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 13 नोव्हेंबरला भरली आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्हा नदीवर स्नान सोहळा संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
🔰 जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. १३) वाहतूक बदल करण्यात आला आहे.
— पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) November 12, 2023
वाहन चालकांनी १३ नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री १० वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा.
🚨 पुणे ग्रामीण पोलीस दल pic.twitter.com/zIGdGczLtb
जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल
खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून ट्वीट करत माहिती देण्यात आलेली आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, "जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. 13) वाहतूक बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी 13 नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा." असं आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलानं ट्वीटमध्ये सांगितल्यानुसार, "बारामती आणि निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. संबंधित वाहनं मोरगाव-सुपा- केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गवरून पुणे मार्गे वळविण्यात येणार आहे." तसेच, "पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण- सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद केली जाणार आहे. संबंधित वाहतूक सासवड- नारायणपुर- कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड- वीर फाटा-परींचे वीर-वाठार मार्गे लोणंद मागे वळविण्यात येणार आहे."