एक्स्प्लोर

KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. 

Kalyan Dombivli Municipal Corporation : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे आज जाहीर करण्यात आले आहेत. केडीएमसी मुख्यालयात या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याने त्या पाहण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी  गर्दी केल्याचे दिसून आले.

मागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार आहे. महापालिकेतील 27 गावापैकी 18 गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र प्रभाग रचना करताना या 18 गावांसह करण्यात आली आहे. यंदा 11 प्रभाग  वाढल्याने 133 प्रभाग असणार आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. 

महापालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्र कार्यालयासह पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर हा आराखडा नागरिकांना पाहता येणार  आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची ऐकून लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे.आज जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत एकूण 133 प्रभाग असून 44 पॅनलमध्ये ते विभागण्यात आले आहेत. तर 44 पैकी पहिले 43 पॅनलमध्ये 3 उमेदवार तर शेवटच्या म्हणजेच 44 व्या पॅनेलमध्ये 4 उमेदवार असणार आहेत. ही प्रभाग रचना www.kdmcelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर आज जाहीर झालेल्या या प्रारूप वॉर्ड रचनेबाबत हरकती नोंदवण्यासाठी 14 फेब्रुवारीपर्यंतचा 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी प्राप्त होणाऱ्या हरकतींवर निवडणूक आयोग सुनावणी घेऊन 26 फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार ,762
अनुसूचित जाती : 1 लाख 50 हजार 171
अनुसूचित जमाती : 42 हजार 584
एकूण सदस्य : 133  महिला : 67
अनुसूचित जाती : 13 ,महिला : 07
अनुसूचित जमाती : 04 ,महिला : 02
सर्वसाधारण 116, महिला 58
3 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,258
4 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677

दरम्यान प्रभाग रचनेची प्रारूप यादी जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. प्रभाग रचना पाहण्यासाठी माजी सदस्य, इच्छुक सदस्यांची धावपळ सुरू झाली मात्र पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असल्याने तारंबळ उडाल्याचे दिसून आले. निवडणुका होणार हे निश्चित झाले असून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळZero Hour : 1 किमीच्या रुंदीकरणाला 10 वर्ष लागणार? अकोला महापालिकेचा संथ कारभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget