एक्स्प्लोर
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एक लाखापर्यंत मेगाभरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक या बँकांतर्फे मार्च 2019 पर्यंत एक लाख नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट नोकरभरती करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक या बँकांतर्फे मार्च 2019 पर्यंत एक लाख नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बँकांचा चेहरामोहरा बदलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या बँकांमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, अॅनलिटिक्स, स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस अशा विभागातील पदांवर नव्या जागा भरण्यात येणार आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेली स्पर्धा पाहता व्यवसायात वाढ करण्यासाठी ही पावलं उचलण्यात येणार आहेत.
सार्वजनिक बँकांमध्ये लेखनिकांची संख्या कमी आणि अधिकाऱ्यांची संख्या जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे लेखनिकांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. वरिष्ठ पातळीवरील पदे सोडून लेखनिक, मॅनेजमेंट ट्रेनी आणि प्रोबेशनल ऑफिसर्सच्या पदांच्या मिळून गेल्या दोन वर्षांत 95 हजार जागा भरण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोणकोणत्या जागांसाठी भरती?
वेल्थ मॅनेजमेंट, अॅनलिटिक्स, स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस, चीफ एथिक्स ऑफिसर, चीफ मार्केटिंग ऑफिसर, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, चीफ लर्निंग ऑफिसर, हेड अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग कॅम्पेनर
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















