(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : पिंपरी चिंचवड, उल्हासनगर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी पिंपरी चिंचवड, उल्हासनगर महानगरपालिकामध्ये काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
विविध पदांच्या 168 जागांसाठी भरती होत आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- पहिली पोस्ट - कनिष्ठ अभियंता स्थापत्य
- एकूण जागा – 32
- शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी
दुसरी पोस्ट - सुपरवायझर
- एकूण जागा – 20
- शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी
तिसरी पोस्ट – निरीक्षक
- एकूण जागा – 16
- शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
चौथी पोस्ट – आरोग्य सहाय्यक
- एकूण जागा – 16
- शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव महत्वाचा आहे.
पाचवी सर्वाधिक जागा असलेल्या जागा आहेत – माळीसाठी
- एकूण जागा – 52
- शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
यासोबतच पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी 4, उद्यान अधिकारीसाठी 8, सहाय्यक उद्यान अधिकारीसाठी 8, परवाना निरीक्षक पदासाठी 4, लाईव्हस्टॉक सुपरवायजरसाठी 4, ऍनिमल किपरसाठी 4 जागा आहेत.
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट - www.pcmcindia.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
उल्हासनगर महानगरपालिका
- एकूण जागा – 9
- पहिली पोस्ट – फिजिशियन
- एकूण जागा – 3
- शैक्षणिक पात्रता – MBBS (MD)
दुसरी पोस्ट – भूलतज्ज्ञ
- एकूण जागा – 3
- शैक्षणिक पात्रता – MBBS (MD) किंवा MBBS (DA) आणि किमान 5 वर्षांचा अनुभव
तिसरी पोस्ट – बालरोगतज्ज्ञ
- एकूण जागा – 3
- शैक्षणिक पात्रता – MBBS MD/ DNB किंवा DCH
- वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत
- नोकरीचं ठिकाण- उल्हासनगर
- थेट मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीचं ठिकाण - वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका
- अधिकृत वेबसाईट - www.umc.gov.in
- मुलाखतीची तारीथ – 7 सप्टेंबर 2021