एक्स्प्लोर

जितेंद्र नवलानी प्रकरणात एसीपींचा चौकशी अहवाल नवलानीच्या बाजूने, सरकारी वकीलांचा हायकोर्टात दावा

जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani Case) प्रकरणात एसीपींचा चौकशी अहवाल नवलानीच्या बाजूने आहे, असा दावा सरकारी वकीलांनी हायकोर्टात केला आहे.

Jitendra Navlani Case : जितेंद्र नवलानी प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दाखल केलेला अहवाल हा नवलानी यांना वाचवण्यासाठीच दाखल केल्याचा खळबळजनक आरोप राज्य सरकाच्यावतीने हायकोर्टात करण्यात आला आहे. नवलानी यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून हायकोर्टाने गुरूवारी आपला निकाल राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली. 23 नोव्हेंबर 2019 मध्ये गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलानी यांच्याच हॉटेलात झालेल्या एका हाणामारीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत हा गुन्हा दाखल करून आपल्याला यात गोवल्याचा नवलानी यांनी आरोप केला आहे. तर  हे निव्वळ एका हाणामारीचं प्रकरण नसून यात एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारत त्याला त्याचं कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्ट करत राज्य सरकारनं हा गुन्हा रद्द करण्यास विरोध केला आहे. मात्र, मारहाणीच्या याच प्रकरणी दाखल गुन्ह्यातूनं नवलानी यांचं नाव हटवण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दबाव टाकल्याचा आरोप तक्रारदार पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.  

 कोण आहेत जितेंद्र नवलानी? 

संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र नवलानी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. ईडीकडे येणाऱ्या प्रकरणांतील वसूली एजंट असं राऊतांनी नवलानींचं वर्णन केलं होतं. याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत नवलानी यांचं नाव पहिल्यांदा जोडलं गेलं होतं. परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असल्यामुळे याच गुन्ह्यातून नवलानी यांचं नाव हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदार पोलीस अधिकारी अनूप डांगे यांनी केला होता. परंतु, आपण तसं करण्यास नकार दिला, त्यावेळी आपली बदली करण्यात आली आणि नंतर ही बदली रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांच्यावतीने दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरून परमबीर सिंह आणि रेस्टॉरंट बार मालकांचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही झाला होता.

 नेमकं काय घडलं होतं 'त्या' रात्री?

23 नोव्हेंबर 2019 च्या रात्री जितेंद्र नवलानी यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस ते 'डर्टी बन्स' या स्वत:च्या मालकीच्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत साजरा करत होते. रात्रीचे दोन वाजले तरी हॉटेल सुरूच असल्यामुळे रात्रपाळीवर असलेले अनुप डांगे बार बंद करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांची तिथं बातचीत सुरू असताना अचानक तेथील लिफ्टमध्ये काहीजणांत हाणामारी सुरू झाली. या मारामारीमध्ये काही महिलांसह सहा जणांचा समावेश होता. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार रोहन, योहान साची मेकर, इसराम मुन्नार यांच्यात हाणामारी सुरू होती. ती सोडवण्यासाठी अनूप डांगे मध्ये पडले असता त्या महिलेनं डांगे यांना शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये डांगे यांचा युनिफॉर्म फाटला. तेथेच उपस्थित असलेल्या संतोष जहांगिर याने अचानक मधे घुसत हाणामारीला सुरूवात केली. यावेळी डांगे यांनाही मार लागला. त्यानंतर जितेंद्र नवलानी यांनी मध्ये पडत सर्वांना तेथून बाजूला केलं आणि निघून जाण्यास सांगितलं. मात्र, डांगे जहांगिर याला पकडण्यासाठी पुढे सरसावले त्यावेळी नवलानी यांनी त्यांना अडवलं आणि जहांगिरला तिथून पळून जाण्यास मदत केली, असा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झालेल्यांपैकी रोहन आणि योहान यांना त्या रात्रीच पोलिसांनी जागेवर जामीन मंजूर केला. साची मेकर आणि इसराम मुन्नार यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर फरार संतोष जहांगिर उर्फ सत्याला नंतर अटक करण्यात आली. मात्र त्यालाही कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे जितेंद्र नवलानी यांनी गुन्हा रद्द करण्याऐवजी दोषमुक्तीची याचिका दाखल करायला हवी असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरूणा पै कामत यांनी हायकोर्टात केला. मात्र, एप्रिल 2020 मध्ये पोलीस उपायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालात या संपूर्ण प्रकरणात जितेंद्र नवलानी यांना क्लीन चीट देण्यात आल्याचा दाखला त्यांच्यातर्फे जेष्ठ वकील आभात पोंडा यांनी हायकोर्टात केला आहे.

Who is Jitendra Navlani : संजय राऊतांनी दुसऱ्यांदा नाव घेतेलेले जितेंद्र नवलानी कोण आहेत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSwapnil Kusale Majha Katta  | ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी गुरूशिष्याची जोडी 'माझा कट्टा'वर ABP MajhaABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget