(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna Raid : जालन्यातील आयकर छाप्यामध्ये मोठं अपडेट! आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता
Maharashtra Jalna aurangabad IT Raid : जालन्यातील आयकर छाप्यांत आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.आणखी रोकड आणि अन्य ऐवज हाती लागण्याची शक्यता आहे.
Jalna IT Raid : जालना, औरंगाबादमधील आयकर खात्याच्या (Maharashtra Jalna aurangabad IT Raid) कारवाईमध्ये मोठं घबाड लागलं. जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर (Jalna Marathwada steel company Raid) टाकलेल्या छापेमारीची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. जालन्यातील आयकर छाप्यांत आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. स्टील कारखानदार आणि अन्य व्यावसायिकांच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांत 30 लॉकर्सची तपासणी पूर्ण झाली आहे. तर आणखी 30 लॉकर्सचा तपास सुरू आहे. कालपर्यंत 58 कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. तर उर्वरित 30 लॉकर्समध्ये आणखी रोकड आणि अन्य ऐवज हाती लागण्याची शक्यता आहे.
जालन्यात तब्बल 390 कोटींचं घबाड आयकर विभागाच्या हाती लागलं. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले. तब्बल आठ दिवस चाललेल्या या कारवाईचा मागमूसही जालन्यातल्या लोकांना लागला नाही. इतकी ही कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती. तब्बल 400 हून अधिक अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सामिल झाले आणि शंभरावर गाड्या त्यासाठी आल्या होत्या. पण ही कारवाई गुप्त ठेवण्यासाठी आयकर विभागानं अनोखी शक्कल लढवली. कारवाईच्या ठिकाणी गाड्यांवर 'राहुल वेड्स अंजली' असे स्टिकर्स लावून लगीनघाई असल्याचं चित्रं निर्माण केलं. कारवाईत सापडलेली 58 कोटींची रोकड 35 कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
जालन्यातील स्टील उद्योग किती मोठा?
जालन्यात लोखंडी सळ्या निर्मितीचे 14 मोठे आणि 22 लहान कारखाने
कारखान्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा एकूण 20 हजार जणांना रोजगार
जालन्यातून कोट्यवधी रुपयांचा प्राप्तिकर आणि जीएसटीचा वाटा
स्टील कारखान्यांतून दर महिना वीज वितरण कंपनीला १०० ते १५० कोटींचा वीजबिल भरणा
स्टील उद्योगातून महिन्याकाठी हजारो टन उत्पादन, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात मागणी
स्क्रॅप खरेदीत घट केल्याने जवळपास 200 ते 250 ट्रक जाग्यावर उभ्या
जालना औद्योगिक वसाहतीमध्ये आयकर विभागाने स्टील कारखान्यावर धाड टाकली. मात्र याचा काहीसा परिणाम वेगवेगळ्या घटकांवर पाहायला मिळत आहे. लोखंडी सळ्या उत्पादित करणाऱ्या या कारखान्यांनी स्क्रॅप खरेदीत घट केल्याने जवळपास 200 ते 250 ट्रक जाग्यावर उभ्या आहेत. आयकर खात्यानं टाकलेल्या छाप्यावर जालन्यातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी यांनी प्रतिक्रिया दिली. आयकर खात्यानं अजून कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही, कारखान्यावर पडलेल्या छाप्यात गौडबंगाल नाही, असं त्यांनी म्हटलंय.
जालन्यात कुठं-कुठं छापेमारी?
1. एसआरजे पित्ती स्टील, स्थापना 1985
2. कालिका स्टील, स्थापना 2003
3. श्री राम स्टील, स्थापना 2012
4. एक को-ऑपरेटिव्ह बँक
इतर महत्वाच्या बातम्या
Jalna Raid : जालन्यामधील स्टील उद्योजकांवरील धाडीची देशभर चर्चा; जालन्यातील स्टील उद्योग किती मोठा?