Jalna : 120 कोटी रुपयांचा बेहिशोबी कच्चा माल, 56 कोटींची रोकड, 14 कोटींचे दागिने; जालन्यातील कारवाईवर आयकर विभागाचे परिपत्रक जारी
Income Tax : जालन्यातील स्टील कंपन्यावर टाकलेल्या धाडीसंबंधी आयकर विभागाने परिपत्रक जारी केलं असून त्यामध्ये काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती दिली आहे.
![Jalna : 120 कोटी रुपयांचा बेहिशोबी कच्चा माल, 56 कोटींची रोकड, 14 कोटींचे दागिने; जालन्यातील कारवाईवर आयकर विभागाचे परिपत्रक जारी Jalna Income Tax raid 120 crores of unaccounted raw materials 56 crores of cash 14 crores of jewelery Jalna : 120 कोटी रुपयांचा बेहिशोबी कच्चा माल, 56 कोटींची रोकड, 14 कोटींचे दागिने; जालन्यातील कारवाईवर आयकर विभागाचे परिपत्रक जारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/c14a8e5433546098088343f3bedfa7a9166023330879993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna IT Raid : जालना, औरंगाबादमधील आयकर खात्याच्या (Maharashtra Jalna aurangabad IT Raid) कारवाईमध्ये मोठं घबाड लागल्याची माहिती आहे. जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर (Jalna Marathwada steel company Raid) टाकलेल्या छापेमारीची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. या छापेमारीसंबंधी आयकर विभागाने अधिकृत प्रेसनोट जारी केली आहे.
काय म्हटलंय आयकर विभागाच्या प्रेसनोटमध्ये?
आयकर विभागाने 3 ऑगस्ट रोजी स्टील टीएमटी बारच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या दोन प्रमुख उद्योगांवर छापेमारी केली. या छापेमारीत जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईमध्ये पसरलेल्या 30 हून अधिक ठिकाणांचा समावेश होता. या छापेमारीच्या दरम्यान अनेक दोषी पुरावे सापडले आहेत आणि जप्त करण्यात आले आहेत.
दोन्ही उद्योगांकडून जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, ते अनेक संस्थांकडून बोगस खरेदीद्वारे खर्च वाढवून मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करण्यात गुंतले आहेत. या संस्थांचा जीएसटी घोटाळ्यातही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. कच्च्या मालाचा जास्तीचा साठा, हिशेबाच्या वहीत नोंद नसलेला 120 कोटी रुपयांहून जास्त असल्याचा पुरावा सापडला आहे.
एका उद्योगातून सापडलेल्या पुराव्यांच्या तपासणीत पुढे असे दिसून येते की कोलकाता स्थित शेल कंपन्यांकडून मिळवलेल्या बोगस असुरक्षित कर्जे आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून त्याने आपले बेहिशेबी उत्पन्न जमा केले आहे.
शोध पथकाला मोठ्या प्रमाणात कंपन्यांच्या कर्मचार्यांच्या नावाने उघडले गेलेले लॉकर्स सापडले आहेत. या खात्यांची देखभाल सहकारी बँकेकडून केली जायची. छापेमारीच्या दरम्यान या सहकारी बँकेतील अनेक लॉकर्ससह 30 हून अधिक बँक लॉकर्सची झडती घेण्यात आली. या लॉकर्समधून मोठी बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. शिवाय, एका गटाच्या फार्म हाऊसवर असलेल्या गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या छापेमारीमुळे 56 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 14 कोटी रुपये किमतीचे सराफा आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde : माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल, पंकजा मुंडेंची खदखद
- Supreme Court on Freebies distribution : राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी अवैधचे वैध करतात, फ्री स्कीम्सवरून सरन्यायाधीशांचे कडक ताशेरे! निवडणूक आयोगालाही फटकारले
- Raksha Bandhan : भावना गवळींनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, फेसबुकवर पोस्ट केला फोटो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)