एक्स्प्लोर

गाड्यांवर 'राहुल weds अंजली'चे बोर्ड; इनकम टॅक्सचं वऱ्हाड करचुकव्यांच्या घरात, जालन्यातील धाडीमागची फिल्मीस्टाईल कहाणी

jalna IT Raid Updates: आयटीच्या अधिकाऱ्यांनी धाडीमध्ये वापरलेल्या गाड्यांवर लग्नामध्ये वापरल्या जाणारे बोर्ड वापरले होते. आयटीच्या पथकाने छापेमारीबाबत कमालीची गुप्तता बाळगली.

Maharashtra jalna News Updates: पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत (West bengal IT Raid) सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी कारवाई जालन्यात (Jalna IT Raid News) झालीय.  जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय.  त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय.  विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले. 

जालन्यातील धाडीमागची फिल्मीस्टाईल रंजक कहाणी समोर आली आहे. आयटीच्या अधिकाऱ्यांनी या धाडीमध्ये वापरलेल्या गाड्यांवर लग्नामध्ये वापरल्या जाणारे बोर्ड वापरले होते. आयटीच्या पथकाने छापेमारीबाबत कमालीची गुप्तता बाळगली.  नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत कारवर वरवधूच्या नावाचे स्टिकर लावले होते. काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावले होते. 

त्याचं झालं असं की, 3 ऑगस्टच्या सकाळी  आयकर विभागाच्या 100हून अधिक गाड्या नाशिक आणि औरंगाबादवरुन जालन्यात दाखल झाल्या. या गाड्यांवर विवाहसोहळ्याचे स्टिकर लावले होते. 100 हून अधिक गाड्यांमध्ये 400 च्या जवळपास अधिकारी आणि कर्मचारी होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या पाहून जालनेकरांना काही लक्षातच आलं नाही. कुणाच्या तरी लग्नासाठी या गाड्या आल्या असाव्यात असा अंदाज नागरिकांचा होता.   

जालन्यात आयकरच्या छाप्यात 390 कोटींचं घबाड सापडल्यानंतर या कारवाईबाबत नवी मिळतेय. राज्य आणि केंद्राच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतरच आयकर खात्यानं ही कारवाई केली अशी माहिती मिळाली आहे. स्टील कारखाने आणि भंगार डिलर यांनी जीएसटीचं बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याची माहिती जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी आयकर खात्याला दिली. त्यानंतर आयकर खात्यानं जालना आणि औरंगाबादमधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि ही कारवाई अजूनही सुरुच आहे, असं आयकरमधील सूत्रांनी म्हटलं आहे. 

एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांची कारवाई

आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. याचा प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदार आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. 

कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड

आयकर विभागाला या कारवाईत सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.

बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त

जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget