एक्स्प्लोर

Jalna Raid : जालन्यामधील स्टील उद्योजकांवरील धाडीची देशभर चर्चा; जालन्यातील स्टील उद्योग किती मोठा? 

जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर टाकलेल्या छाप्यात आयकर खात्याच्या हाती तब्बल 390 कोटींचं घबाड लागलं आहे. या कारवाईतील नवनवी माहिती आता समोर येतेय.

Jalna IT Raid : जालना, औरंगाबादमधील आयकर खात्याच्या (Maharashtra Jalna aurangabad IT Raid) कारवाईची राज्यासह देशभरात चर्चा सुरु आहे. जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर (Jalna Marathwada steel company Raid) टाकलेल्या छाप्यात आयकर खात्याच्या हाती तब्बल 390 कोटींचं घबाड लागलं आहे. या कारवाईतील नवनवी माहिती आता समोर येतेय. 58 कोटींची रोकड, 32 किलो सोनं असं सगळं सापडत असताना याची माहिती जालन्यातल्या लोकांना लागली नाही. तब्बल आठ दिवस ही कारवाई सुरु होती आणि आयकर विभागानं कारवाई गुप्त ठेवण्यासाठी लगीनघाईचं चित्रं उभं केलं होतं. त्यासाठी कारवर 'राहुल वेड्स अंजली'चे स्टिकर्स लावले होते. ही कारवाई इतकी मोठी होती की 10 ते 12 मशिनच्या सहाय्यानं तब्बल १३ तास रोकड मोजण्यासाठी लागले. तर मालमत्तेची मोजदाद करताना आयकरचे काही अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडले. 

जालन्यातील स्टील उद्योग किती मोठा?

जालन्यात लोखंडी सळ्या निर्मितीचे 14 मोठे आणि 22 लहान कारखाने

कारखान्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा एकूण 20 हजार जणांना रोजगार

जालन्यातून  कोट्यवधी रुपयांचा प्राप्तिकर आणि जीएसटीचा वाटा

स्टील कारखान्यांतून दर महिना वीज वितरण कंपनीला १०० ते १५० कोटींचा वीजबिल भरणा

स्टील उद्योगातून महिन्याकाठी हजारो टन उत्पादन, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात मागणी

या उद्योजकांवर कारवाई

आयकर खात्यानं कुणावर छापे टाकले त्यांची नावं समोर आली आहेत. आयकर खात्याच्या पथकांनी जालन्यातील  व्यावसायिक, डिलर आणि एका सहकारी बँकेवर छापे टाकले. त्यात जालन्यातील एसआरजे स्टील कंपनी, कालिका स्टील कंपनीमध्ये छापे टाकण्यात आले. खासगी फायनान्सर विमलराज सिंघवी आणि डिलर प्रदीप बोरा यांच्या व्यापारी प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. या छाप्यात कुणाकडे किती संपत्ती सापडली याबाबत आयकर विभाग प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्याची शक्यता आहे. तूर्त कारवाई झालेल्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या माहितीनंतरच आयकर खात्याची कारवाई

जालन्यात आयकरच्या छाप्यात 390 कोटींचं घबाड सापडल्यानंतर या कारवाईबाबत नवी मिळतेय. राज्य आणि केंद्राच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतरच आयकर खात्यानं ही कारवाई केली अशी माहिती मिळाली आहे. स्टील कारखाने आणि भंगार डिलर यांनी जीएसटीचं बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याची माहिती जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी आयकर खात्याला दिली. त्यानंतर आयकर खात्यानं जालना आणि औरंगाबादमधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि ही कारवाई अजूनही सुरुच आहे, असं आयकरमधील सूत्रांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

गाड्यांवर 'राहुल weds अंजली'चे बोर्ड; इनकम टॅक्सचं वऱ्हाड करचुकव्यांच्या घरात, जालन्यातील धाडीमागची फिल्मीस्टाईल कहाणी

Jalna : जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Embed widget