एक्स्प्लोर

Jalgaon News : खडसे की महाजन? कोण उधळणार विजयाचा गुलाल, आज जळगाव जिल्हा दूध संघाचा निकाल

Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा (Jalgaon zilla Dudh Sangh Election) निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी काल 100 टक्के मतदान झाले आहे.

Jalgaon zilla Dudh Sangh Election Result : आजचा दिवस जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा (Jalgaon zilla Dudh Sangh Election) निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झाले आहे. एकूण 20 जागांसाठी शनिवारी सकाळी आठ ते पाच या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली होती. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आज सकाळी आठ वाजता शहरातील रिंग रोड वरील सत्यवल्लभ हॉल या ठिकाणी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकनाथ खडसे एकटे पडल्याचे दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठी ही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

विजय आमचाच, महाजनांसह खडसेंनाही विश्वास

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील विजयाचा दावा केला आहे. त्यामुळं या दोघांमध्ये आता कोणाच्या बाजूनं निकाल हे आज स्पष्ट होणार आहे.  जिल्हा दूध संघाची निवडणूक आमच्यासाठी कबड्डीच आहे. मी क्रीडामंत्री असल्यानं तर दुसरीकडे गुलाबराव पाटील माझ्यासोबत असल्यानं या स्पर्धेत विजय आमचाच होईल असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे. गिरीश महाजन हे उत्तम कबड्डी खेळत असले तरी मी अंपायर आहे  असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं होते. खडसेंच्या या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार घेतला. अंपायर वगैरे काही नाही. त्यांनी आमच्या समोर या निवडणुकीची कबड्डी खेळा आणि जिंकून दाखवा असं आव्हान एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या:

Jalgaon News : एकनाथ खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, खडसे आपलेच, त्यांना सहकार्य करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget