एक्स्प्लोर

आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापुरात महापूर आला? काय आहे आलमट्टीचं सत्य?

राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कर्नाटकमधल्या आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. परंतु खरंच या पुराला आलमट्टी धरण कारणीभूत आहे का?

उस्मानाबाद : राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कर्नाटकमधल्या आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. परंतु खरंच या पुराला आलमट्टी धरण कारणीभूत आहे का? आलमट्टीचं सत्य काय आहे? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. महाराष्ट्रातल्या कोयना धरणाची क्षमता 119 टिएमसी आहे. तर कर्नाटकातल्या आलमट्टी धरणाची क्षमता आहे 123 टिएमसी. 2005 साली सांगली कोल्हापूरात पूर आल्यावर दोन राज्यांमधील तज्ज्ञांनी मिळून आलमट्टीमुळे महाराष्ट्रात पुर येतो का? याचा अभ्यास केला. हा अभ्यास करताना आलमट्टीवर अवलंबून असलेल्या शेती, पिण्याच्या पाण्याची आणि ओद्योगिक गरज लक्षात घेवून आलमट्टीत 518.50 मीटर इतके पाणी साठवून ठेवण्याची परवानगी देण्यात आली. एवढी पातळी जर राखली तर धरणात 110 टिएमसी पाणी राहते. सांगली आणि कोल्हापूरात अतिरिक्त पाऊस व्हायला 30 तारखेपासून सुरुवात झाली. जलसंधारण विभागाने पंचगंगा आणि कृष्णेच्या पुरनियंत्रण रेषेच्या आत झालेल्या बेकायदेशीर बांधाकामांवर पुराचे खापर फोडले आहे. याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाने आलमट्टी धरणातल्या पाण्याच्या पातळीची अधिकृत आकडेवारी पाहिली. 25 जुलैला आलमट्टी धरणात 519.18 मीटर इतके पाणी होते. 30 जुलैला 519.20 मीटर इतके पाणी होते. सांगली कोल्हापुरात पुर येवू लागल्यावर म्हणजेचे २ ऑगस्टला आलमट्टीतल्या धरणातली पाणी पातळी 518.41 मीटर इतकी होती. 3 ऑगस्टला 518.31 मीटर इतके पाणी होते. 4 ऑगस्टला 518.15 मीटर इतके पाणी होते. 5 ऑगस्टला 517.87 मीटर इतके पाणी होते. 6 ऑगस्टला 517.67 मीटर इतके पाणी होते. 7 ऑगस्टला 517.26 मीटर इतके पाणी होते. 8 ऑगस्टला 517.10 मीटर इतके पाणी होते. 9 ऑगस्टला 517.08 मीटर इतके पाणी होते. 10 ऑगस्टला 517.30 मीटर इतके पाणी होते. याचाच अर्थ 2005 साली ठरलेल्या 518.50 मीटर पाणी पातळीपेक्षा आलमट्टी धरणात पाणी पातळी वाढली नव्हती. तसेच पूर ज्या काळात आला, त्या काळातही धरणात पाणी अधिक साठवले नव्हते. त्यामुळेच महापुराचं खापर आलमट्टी धरणावर फोडणे चुकीचे ठरेल. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा आणि पंचगंगेच्या खोऱ्यातील बेकायदा बांधकामं ही पुराला कारणीभूत असण्याची शक्यता अधिक बळावते. व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Rain : गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
Nashik Rain: नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस
नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget