एक्स्प्लोर
मेट्रोच्या कामावेळी लोखंडी फ्रेम कोसळून कारचा चक्काचूर
जैन यांना नुकसानभरपाई देण्याचा तातडीने निर्णयही नागपूर मेट्रो प्रशासनाकडून घेण्यात आला.
नागपूर : नागपूर मेट्रोचे काम सुरु असताना एक वजनदार लोखंडी फ्रेम कोसळून एका कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
नागपूरच्या दारोडकर चौकातील सेंट्रल अव्हेन्यू येथे सकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जैन प्लास्टिकच्या दुकानासमोर जयेश जैन यांची कार पार्किंगला लावलेली होती.
मेट्रो मार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी एसएस फ्रेम मजूर साखळीच्या मदतीने वर उचलून नेत होते. त्यावेळी साखळी तुटली आणि फ्रेम या खाली पार्किंगमध्ये असलेल्या कारवर कोसळली.
या दुर्घटनेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तातडीने तेथील मलबा बाजूला करण्यात आला.
जैन यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही नागपूर मेट्रो प्रशासनाकडून घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement