एक्स्प्लोर
पहिल्याच चेंडूवर विकेट घेणार म्हणणारे मुंडे शून्यावर बाद
धनंजय मुंडे म्हणाले की, "या वेळी पहिल्याच मी बॉलमध्ये विकेट घेणार आहे." धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधकांची विकेट घेत निवडणूक जिंकणार असे सांगत होते.

परळी : सरकार विरोधात राजकीय फटकेबाजी करण्यात तरबेज असलेल्या धनंजय मुंडे याच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे परळी येथे 'डे नाईट क्रिकेट टूर्नामेंट' चे आयोजन करण्यात आले आहे. या टूर्नामेंटच्या उद्घाटनप्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले की, "या वेळी पहिल्याच मी बॉलमध्ये विकेट घेणार आहे." धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधकांची विकेट घेत निवडणूक जिंकणार असे सांगत होते. परंतु उद्घाटनानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले धनंजय मुंडे स्वतः मात्र शून्यावर बाद झाले. यापूर्वी दोन वेळा परळी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुंडेंना क्रिकेटच्या मैदानात प्रश्न विचारण्यात आला की, यापूर्वीच्या दोन्ही मॅचमध्ये तुम्हाला विकेट मिळाली नव्हती, आगामी मॅचबाबत काय सांगाल? त्यावर मुंडे म्हणाले की, "या वेळेला पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेणार" असे म्हणून पंकजा मुंडेंचे नाव न घेता धनंजय मुंडेंनी त्यांना आव्हान दिले आहे. या टूर्नामेंटच्या उद्घाटनासाठी क्रिकेटर सुरेश रैना येणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे रैनाच्या चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे मैदानात पहायला मिळत होते. दरम्यान धनंजय मुंडेदेखील फलंदाजीसाठी मैदानात उतरले, परंतु ते शुन्यावर बाद झाले.
आणखी वाचा























