एक्स्प्लोर

HSRP Register Fake Website : HSRP नंबरप्लेट काढताना सावधान!'या' वेबसाईटचा वापर करू नका

HSRP नंबरप्लेटच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून फसवणूक सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण सायबर भामटे नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत आहेत. त्या सहा फेक वेबसाईट कोणत्या,जाणून घेऊयात

HSRP नंबरप्लेटच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून फसवणूक सुरू आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 6 फेक वेबसाईट तयार करून हे सायबर भामटे नागरिकांना फसवताय... त्या फेक वेबसाईट कोणत्या आणि कोणत्या अधिकृत वेबसाईटवरून रजिस्टेशन करायचं पाहूयात..

राज्यात 01 एप्रिलपासून सर्व वाहनांना HSRP नंबर बंधनकारक करण्यात आलंय.. त्यामुळे नागरिक सध्या यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहे. पण याचा गैरफायदा सायबर भामटे घेतायत. सायबर चोरट्यांनी 6 बनावट वेबसाईट बनवून नंबरप्लेट नोंदणींच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालत आहे.

'या' फेक वेबसाईटपासून सावधान

https://bookmyhssp.inmaharahtra.html

-https://bookmyhsrp.com/registration

-https://www.bookmehsrp.com

-https://bookingmyhsrp.com

-https://indnumberplate.com

-https://hsrprto.in

या त्या 6 बनावट वेबसाईट असून नागरिकांनी अशा बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. 

HSRP नंबरप्लेट रजिस्टर करताना फक्त सरकारी वेबसाईटवरूनच ते रजिस्टर करा..  

https://transport.maharashtra.gov.in ज्याच्या शेवटीला  gov.in असेल तीच महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे.

HSRP नंबरप्लेट रजिस्टर कसं करायचं

01 एप्रिल 2025 नंतर राज्यातील सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलंय.. यासाठी रजिस्टेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय समजून घेऊयात..

1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) सक्तीची करण्यात आलेली आहे. . त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे.

त्यासाठी तुम्हाला गुगलवर hsrp number plate असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट transport.maharashtra.gov.in आली असेल. त्यावर क्लिक करा.. त्यानतंर तुमच्या समोर होम पेज आलं असेल... 

आता तुमच्यासमोर Apply High Security Registration Plate Online असं पेज आलं असेल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑफीस सर्च सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्यासमोर तीन पर्याय आले असतील. पण तुम्हाला APPLY HSRP यावर क्लिक करायचं आहे. 

त्यानंतर तुम्हाला Order HSRP यावर क्लिक करायचं... त्यानंतर तुम्हाला येथे गाडीचं Registration Number.. चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक ..इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक..  आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे.. त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल..
त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील.

दुचाकी, ट्रॅक्टर                                       450
तीनचाकी                                               500
चारचाकी, अन्य वाहने                              745

रूपये आकारण्यात येईल...

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget