एक्स्प्लोर
बुलडाण्यात ऑनर किलिंग, बापाकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या

बुलडाणा : बुलडाण्यातील मलकापूरमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने निमखेडीत बापाने पोटच्या मुलीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी निमखेडी इथे आरोपी बाळू हिवरेची मुलगी मनिषाने गणेश हिंगणे नावाच्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे बाळू हिवरे अतिशय संतापला होता. त्याच रागातून मुलीच्या शरीरावर कुऱ्हाडीने वार केले. पोलिसांनी आरोपी वडील बाळू हिवरेला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























