एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे विधानपरिषद : हितेंद्र ठाकूर यांचा डावखरेंंना पाठिंबा, सेना-भाजपची धावाधाव
मुंबई : ठाणे विधानपरिषदेच्या जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेना-भाजपने धावाधाव करायला सुरुवात केली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. ज्यात ठाण्याच्या जागेसाठी ठाकूर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समजतं.
विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, डावखरेंना उमेदवारी
तसंच यासंदर्भात उद्या मातोश्री क्लबमध्ये मुख्यमंत्री, संजय राऊत, ठाण्याचे महापौर आणि भाजपच्या ठाणे-पालघरमधील आमदारांची बैठक होणार आहे.
बविआच्या हितेंद्र ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे वसंत डावखरे आणि शिवसेनेचे रवींद्र फाटक अशी लढत होणार आहे.
विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या जागेसाठी 3 जून रोजी मतदान होणार आहे, तर 6 जून रोजी मतमोजणी होईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement