एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून वाहनचाकाना हेल्मेट सक्तीे केली जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. याची पूर्वतयारी म्हणून पोलीस प्रशासनाने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली असली, तरी शहराअंतर्गत हेल्मेट शक्तीला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे.
सध्या महामार्गावर विना हेल्मेट दुचाकीस्वार सापडला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. याचा दुसरा टप्पा म्हणून 15 जुलै पासून जिल्ह्यासह शहरातही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.
मात्र कोल्हापूरकरांनी या हेल्मेट सक्तीचं स्वागत केलं आहे. हेल्मेट खरेदीसाठी दुकानाबरोबरच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हेल्मेट घेण्याकडे लोकांचा कल दिसतोय. कोल्हापूर शहर आणि महामार्गावर अशा विक्रेत्यांनी हेल्मेटची दुकानं थाटली आहेत.
विश्वास नांगरे पाटलांच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध
शहराअंतर्गत हेल्मेटसक्ती होत असल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शहरात वाढणाऱ्या चोऱ्या, हत्या, मारामाऱ्या यासह मटका, दारु या अवैध व्यवसायाकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन हेल्मेट सक्तीच्या मागे लागल्याचं म्हणंत त्याला विरोध दर्शविला आहे. पार्किंग, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement