कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेसह राधानगरी धरणातून विसर्ग सुरु
कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
![कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेसह राधानगरी धरणातून विसर्ग सुरु Heavy rain continues in Kolhapur and Satara discharge from Koyne and Radhanagari dams starts कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेसह राधानगरी धरणातून विसर्ग सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/31/77b18c5a9911ac9136021625358ae0a31722395236934339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satara Kolhapur Rain News : राज्याच्या विविध भागात पावसाचा (Heavy Rain) जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. दरम्यान, सातारा (Satara) जिल्ह्यात देखील पावसााचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरस (Mahabaleshwar) कोयना धरण (Koyna Dam) परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना धरणात 43 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं कोयाना धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून 40 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावाचा जोर कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरण पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या कोयना नदीपात्रात 42 हजार 100 क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना परिसरात 158 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही पावासाचा जोर वाढला , राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावासाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. आज सकाळी 6 वाजता शेवटचा देखील दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून एकूण 11500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट 4 इंच इतकी आहे.
आजही राज्यात पडणार जोरदार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जोन जिल्ह्यांमा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सावधान! आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)