एक्स्प्लोर
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षेची चुकीची उत्तरपत्रिका अपलोड
नागपूर: एका पदभरतीच्या परीक्षेची मॉडेल उत्तरपत्रिका म्हणून आरोग्य विभागानं चुकीची उत्तरपत्रिका इंटरनेटवर अपलोड केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
आरोग्य विभागाच्या ड संवर्गात मोडणाऱ्या फिल्ड कामगार पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्या परीक्षेची मॉडेल उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांनी बघितली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्या उत्तर पत्रिकेमध्ये साध्या प्रश्नांचीही चक्रावून टाकणारी उत्तर दिली होती.
1. कोणते प्रसिद्ध शहर महाराष्ट्रात नाही?
उत्तर- पुणे
2. खाली दिलेल्या प्राण्यांमध्ये कोणता प्राणी वसाहतीत राहत नाही?
उत्तर- कुत्रा
अशी तब्बल 20 चुकीची उत्तरं या उत्तर पत्रिकेत देण्यात आली आहेत. उत्तर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने एका पदभरती परीक्षेची उत्तर म्हणून नेटवर प्रसिद्ध केलेल्या उत्तरपत्रिकेतील ही उत्तरं आहेत.
या उत्तरपत्रिकेत इतिहास, भुगोल, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयाचा समावेश असलेल्या 100 प्रश्नांपैकी जवळपास 20 चुकीची उत्तरं आरोग्य खात्याने टाकली आहेत. लिखन पारखी यांनी हा घोळ उघड केला आहे.
ही उत्तरं आरोग्य विभागातील गट ड संवर्गात फिल्ड कामगार रिक्त पद भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेची आहेत.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement