Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
Harshvardhan Patil : आमदार अमोल मिटकरी यांनी अत्यंत खोचक शब्दात हर्षवर्धन पाटील यांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी आयाराम की गयाराम असा सवाल केला आहे.
Harshvardhan Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी नेते हर्षवर्धन पाटील भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याने अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अत्यंत खोचक शब्दात टोला लगावला आहे. हर्षवर्धन पाटील यांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी आयाराम की गयाराम असा सवाल केला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.
आयाराम की गयाराम? सहज विचारलं
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामांची चलती असते, त्यामुळे ते पुढे पुढे करत असतात असे बोलताना दिसत आहेत. तोच मुद्दा पकडत अमोल मिटकरी यांनी हर्षवर्धन पाटील यांना आयाराम की गयाराम अशी विचारणा केली आहे. जे पक्ष बदलतात त्यांना त्या पक्षाबद्दल प्रेम नाही, तर त्यांचा स्वार्थ असतो.
आयाराम की गयाराम? सहज विचारलं 😄 pic.twitter.com/BjFWhWtE2g
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 4, 2024
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार
दरम्यान, हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. हर्षवर्धन यांनी इंदापूरमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र ती जागा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या कोट्यात गेल्याने भाजप त्यांना तिकीट देत नाही. हर्षवर्धन यांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. ते 1995-99 दरम्यान शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये कृषी आणि पणन राज्यमंत्री होते. 1999 ते 2014 या काळात ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. 2009 च्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये ते सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेचे युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या