एक्स्प्लोर

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, तीन घटनांत तीन वृद्धांचा मृत्यू

जालना-बुलडाणा रस्त्यावर तीन मित्र 15 मिनिटं कारमध्ये अडकले. गारांच्या तडाख्यामुळे तिघांना आपल्या कारमधून बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं.

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यात झालेली गारपीट शेतमालाच्या नुकसानाबरोबरच नागरिकांच्या जीवावरही उठली आहे. गारपीटीमुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडल्यामुळे 70 वर्षीय नामदेव शिंदे या वृद्धाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे शेतात जात असताना त्यांना गारांचा मार बसला. नामदेव शिंदे, जालना नामदेव शिंदे, जालना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात 65 वर्षांच्या आसाराम जगताप यांचाही गारांचा मार लागून मृत्यू झाला. शौचाला जात असताना गारांच्या तडाख्यात त्यांचा मृत्यू झाला. आसाराम जगताम, जालना आसाराम जगताम, जालना वाशिम जिल्ह्यातील महागाव गावातील यमुनाबाई हूंबाड यांनाही गारांच्या तडाख्यात आपला जीव गमवावा लागला.  त्या 80 वर्षांच्या होत्या. जालना-बुलडाणा रस्त्यावर तीन मित्र 15 मिनिटं कारमध्ये अडकले. गारांच्या तडाख्यामुळे तिघांना आपल्या कारमधून बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुन्हा गारपीट

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला. जालना, वाशिम, बीड, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यात गारपिटीनं अक्षरक्षः थैमान घातलं. काही वेळ ही गारपीट झाली असली तरी अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराइतक्या गारा कोसळल्या. गहू आणि हरभरासारखी पिकं काढणीवर आलेली असताना झालेल्या या गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. नेमकं किती नुकसान झालं, याचा आकडा अद्याप यायचा असला तरी हाताशी आलेला घास हिरावल्या गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं याबाबतचं भाकित वर्तवलं होतं. पंचनाम्याचे आदेश नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाच्या भरपाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे केले जातील, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीसाठी विमा संरक्षण असून मयतांच्या परिवाराला सुद्धा मदत केली जाईल, असं आश्वासन देशमुखांनी दिलं. गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत, असे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. विमा कंपनीसोबत उद्या बैठक बोलवण्याचे निर्देशही फुंडकरांनी दिले आहेत. ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचं तसंच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचं नुकसान झालं आहे, त्याबाबत त्वरित विमा कंपन्यांना माहिती कळवण्यास फुंडकरांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget