Puntamba Gram Sabha : पुणतांब्यात ग्रामसभेला सुरुवात, आंदोलनाची पुढची दिशा आज ठरणार
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन पुणतांब्यातील ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. या चर्चेचा अहवाल आजच्या ग्रामसभेत मांडण्यात येणार आहे.
![Puntamba Gram Sabha : पुणतांब्यात ग्रामसभेला सुरुवात, आंदोलनाची पुढची दिशा आज ठरणार Gram Sabha begins in Puntamba, the next direction of the agitation will be today Puntamba Gram Sabha : पुणतांब्यात ग्रामसभेला सुरुवात, आंदोलनाची पुढची दिशा आज ठरणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/86a9f9f3d9fadca478db8373a5336603_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Puntamba Gram Sabha : पुणतांबा गावात ग्रामसभेला सुरुवात झाली आहे. या ग्रामसभेत आंदोलन सुरु ठेवायचं की स्थगित करायचं? याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेचा अहवाल देखील ग्रामसभेत मांडला जाणार आहे. या ग्रामसभेत आंदोलना बाबतची पुढची दिशा ठरणार आहे. आजच्या या ग्रामसभेला पुणतांब्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात पुणतांब्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नांवरुन ग्रामस्थांनी 1 जूनपासून धरणे आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाची खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दखल घेतली होती. भुसे यांनी पुणतांब्यात येऊन आंदोलकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आंदोलकांनी 4 जूनला आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (8 जून) मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी अनेक मंत्री देखील उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल आजच्या ग्रामसभेत मांडण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या?
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)