एक्स्प्लोर
Advertisement
कुपोषणाच्या समस्येबाबत सरकार गंभीर नाही : मुंबई हायकोर्ट
मुंबई : कुपोषण ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीइतकीच गंभीर समस्या आहे, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, राज्य सरकार कुपोषणाच्या समस्येबाबत अजिबात गंभीर नाही, या शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे.
14 ऑगस्टपर्यंत दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करा किंवा या समस्येशी संबंधित असलेले जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिवांना यासाठी जबाबदार धरलं जाईल, असेही हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले आहे.
जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली जर सरकारने उपाययोजना राबवल्या तर पोलिओ आणि देवीप्रमाणे कुपोषणही हद्दपार करता येईल, असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सराकारला डॉ. अभय बंग यांच्या रिपोर्टवर गांभीर्यानं विचार करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर डॉ. अभय बंग यांनी आपला रिपोर्ट सादर केला होता.
डॉ. बंग यांनी सांगितलं की, “2004 मध्येही त्यांनी नंदुरबार, धुळे व मेळघाट येथील कुपोषणाच्या समस्येबाबत हायकोर्टात आपली मत मांडली होती. मात्र, आज 13 वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. ज्यागतीने कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबायला हवे आहेत, त्या गतीने ते थांबलेले नाहीत. आजही राज्यभरात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वर्षाला 11 हजारांच्या घरात आहे. ज्यात नवजात बालकांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. यातही 50 टक्के मुलांचा मृत्यू महिन्याभरातच होतो. याशिवाय मलेरिया, न्यूमोनिया, जुलाब यांसारखे साथीचे रोग आहेतच.”
राज्यभरातून दरवर्षी जवळपास 2 हजार विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडतात. मात्र, ते दुर्गम भागात जाऊन आपली सेवा देणे पसंत करत नाहीत. शिवाय, सेवा बाँडचा भंग केल्याबद्दल दंड म्हणून जी रक्कम भरणं गरजेचं ती देखील भरत नाहीत. त्यामुळे राज्याला दरवर्षी सुमारे 900 कोटींचं नुकसान होत आहे. मात्र, याकडे कुणीही गांभीर्यानं पाहात नाही, याबाबत डॉ. अभय बंग यांनी खंत व्यक्त केली.
डॉ. अभय बंग यांनी सुचवलेले उपाय :
- राज्यातील आश्रमशाळा अधिक सशक्त करा.
- डॉक्टरांना ग्रामीण आणि दुर्गम भागातील सेवाबौंड सक्तीचा करा.
- प्रत्येक गावात होम बेस केअर सेवा उपलब्ध करावी.
- आदिवासी भागांत दारूबंदी आणि तंबाखुमुक्ती लागू करावी.
- आदिवासी भागांत नशामुक्त गाव, कुपोषणमुक्त गाव असे पुरस्कार सुरू करावेत.
- आदिवासी महिलांना जेवण देण्याऐवजी त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत.
- दुर्गम भागात साथीच्या रोगांवरील औषध सहज उपलब्ध करावीत.
- सरकारी योजना आदिवासी भागांत पोहचतायत का? त्यावर अंमल होतोय का? याची चाचपणी वेळोवेळी करावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement