एक्स्प्लोर

Sangli Crime : बिबट्याची कातडी, सांबरशिंगे आणि खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापुरातील एकजण सांगलीत जेरबंद

Sangli Crime : बिबट्याची कातडी, सांबरशिंगे आणि खवल्या मांजराची खवले यांची तस्करी करणार्‍या एका टोळीचा छडा लावत सुमारे 28 लाखांचे वन्य प्राण्यांचे अवयव मिरजेत पोलिसांनी जप्त केले.

Sangli Crime : बिबट्याची कातडी, सांबरशिंगे आणि खवल्या मांजराची खवले यांची तस्करी करणार्‍या एका टोळीचा छडा लावत सुमारे 28 लाखांचे वन्य प्राण्यांचे अवयव मिरजेत पोलिसांनी जप्त केले. तस्करी करणारा एकजण पोलिस व वन विभागाच्या सापळ्यात अडकला असून एक जण फरार झाला. 

संरक्षित वन्य प्राण्यांचे अवयव बाळगणे, विक्री करण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी अशोक सदाशिव कदम (वय 55 रा. कदमवाडी, पोस्ट केजीवडे, ग्रामपंचायत हासणे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पूर्ण वाढीच्या एक लाखाचे बिबट्याचे हळद, मीठ लावलेले चमडे, पन्नास हजार मुल्याची दोन सांबरशिंगे आणि अत्यंत दुर्मिळ समजल्या जात असलेल्या खवल्या मांजराची दहा लाखाचे 18 किलो खवलेजप्त करण्यात आली.

मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पोस्ट कार्यालयाजवळ एक व्यक्ती वन्य प्राण्यांचे अवयव विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरूवारी रात्री साडेदहा वाजता मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पोस्ट कार्यालयाजवळ सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांनी अधिक्षक बसवराज तेली व अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली वन व पोलीस कर्मचारी यांचा सापळा लावला.

यावेळी संशयास्पद स्थितीमध्ये कदम थांबला होता. त्याच्याजवळ असलेल्या दोन प्लास्टिक पिशव्यांची झडती घेतली असता बिबट्याचे चमडे, सांबराची शिंगे व खवल्या मांजराची खवले मिळून आली. खवल्या मांजराची खवले किलोला एक लाख रूपये दराने विकली जात असल्याचे सांगण्यात आले.

अशोक कदमला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रविराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, सोमनाथ कचरे, प्रमोद खाडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. सपोनि रविराज यांनी यापूर्वी रक्तचंदन, बिबट्याची कातडी, 50 किलो गांजा जप्त करून वन्यप्राणी तस्करी ,आणि अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHAABP Majha Headlines : 12 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar - Jayant Patil : नाराजी अस्वस्थतेच्या चर्चांना पुर्णविराम? जयंत पाटील-शरद पवार एकत्रEknath Shinde Holi 2025 : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवड, नातावासह उपमुख्यमंत्र्यांची मजामस्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Embed widget