एक्स्प्लोर
मराठा आरक्षण : काल दोन, आज चार आमदारांचे राजीनामे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध पक्षातील आमदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध पक्षातील आमदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली. सत्ताधारी भाजपचे नाशिकमधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ. राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
दरम्यान, आमदार राहुल आहेर आणि सीमा हिरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला. समाज मोठा असल्याने हे राजीनामे त्यांच्याकडे दिल्याचं राहुल आहेर आणि सीमा हिरे यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या भारत भालकेंचा राजीनामा
मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ‘मराठा, धनगर, मुस्लिम आणि महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आपण राजीनामा देत आहोत, असं भारत भालकेंनी म्हटलं आहे.
रमेश कदमांचाही राजीनामा
मराठा आरक्षणाची मागणी करत आमदार रमेश कदम यांनी राजीनामा दिला. रमेश कदम हे सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघाचे आमदार आहेत.
दुसरीकडे, औरंगाबादचे भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही मराठा आरक्षणाची मागणी करत यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement