एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नागरी सत्कार, शरद पवार म्हणतात...
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार आज नागपुरात पार पडला. यावेळी बोलताना शरद पवारांनी प्रतिभाताई पाटील यांच्या राजकीय जीवनातील अनेक किस्से सांगितले.
नागपूर : प्रतिभाताईंच्या प्रचाराचा श्रीगणेशा आम्ही मुंबईतील मातोश्रीवरून केला. बाळासाहेबांना भेटलो, त्यांना सगळ सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, चर्चा कसली करायची, आपली कन्या आहे. शिवसेनेची सगळी मत तिला मिळणार आज या सोहळ्याला बाळासाहेंबाचा सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहे आणि हा चांगला योगायोग आहे', हा किस्सा सांगत शरद पवारांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार आज नागपुरात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी प्रतिभाताई पाटील यांच्या राजकीय जीवनातील अनेक किस्से सांगितले. त्यावर आपण पवारांचं का ऐकलं हे आज कळालं असेल, अशी कोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना त्यांचा सुस्वभाव, मृदू भाषा मला कधी लाभली नाही. कारण त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. दिल्लीत सोनिया गांधी कडे राष्ट्रापती पदाबाबत बैठक होती. तेव्हा अनेक नाव समोर आली. त्यात प्रतिभा ताईंचं नाव पुढे आला आणि सोनिया गांधी म्हणाल्या आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती झाली नाही. निवडणुकीत काळजी घ्यायची गरज होती, त्यांची निवड झाली. प्रतिभाताईंचा फॉर्म भरण्यापासून सगळं होईपर्यंत मी बरोबर होतो. प्रचाराचा श्रीगणेशा आम्ही मुंबईतील मातोश्रीवरून केला. बाळासाहेबांना भेटलो, त्यांना सगळ सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, चर्चा कसली करायची, आपली कन्या आहे. शिवसेनेची सगळी मत तिला मिळणार. तेव्हा शिवसेना एनडीमध्ये होती. बाळासाहेबांच्या पाठींब्यामुळे उमेदवार निवडून आले. आज या सोहळ्याला बाळासाहेंबाचा सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहे आणि हा चांगला योगायोग आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आता कळलं का पवार साहेब मी का ऐकलं. बाळासाहेबांनी त्याच ऐकलं होतं, मग मी त्याच कसं ऐकणार नाही. तेव्हा आमच्यावर दडपण आणल होतं. रोज बातम्या यायच्या निर्णय घ्या,नाहीतर म्हंटल नाहीतर काय? एकदा बाळासाहेबांनी ठरवलं, त्या आड कोणी येणार नाही. महाराष्ट्राच्या अभिमानात सहभागी होता आलं. प्रतिभाताई तुम्ही देशाची मान उंचावली. सुखोईमध्ये ताई बसल्या, कस काय केल? ताईंनी करियर सुरू केलं तेव्ह मी दोन वर्षांचा होतो. इतक्या मोठ्या लोकांचे मार्गदर्शन मला लाभले. राजकारण, मतभेद असतात, मतभेद असावेत पण मतभेद असले तरी बाळासाहेब आणि पवारांची मैत्री तुटली नाही. कडाडून विरोध केला तरी मैत्रीचा धागा तुटला नाही. माजी मुख्यमंत्री आज बसून एकमेकांच कौतुक करतात हे असं असावं, नाहीतर मोठी मोठी नाव घ्यायची आणि एकमेकांवर तलावर घेऊन जायचं. उद्या हा फोटो आला की, किती धक्का बसेल.
WEB EXCLUSIVE | माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अमरावतीकरांना काय वाटतं? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement