एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात चारा छावण्या बंद होणार नाहीत : चंद्रकांत पाटील
राज्यभरात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने त्याचा परीणाम जनावरांसाठीच्या चारा आणि पाण्यावर होणार आहे. त्यामुळे चारा छावण्या बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, - चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यभरात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने त्याचा परीणाम जनावरांसाठीच्या चारा आणि पाण्यावर होणार आहे. त्यामुळे चारा छावण्या बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, उलट जानेवारीनंतर निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पूर्ण तयारी करण्यात आली असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. परंतु राज्यभर सरसकट चारा छावण्या उभारण्यात येणार नसून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्याच्या दोन मंत्र्यांनी चारा छावण्यांबाबत जाहीर केलेल्या दोन वेगवेगळ्या मतांमुळे शेतकरी संभ्रमित झाला आहे. चारा छावण्या बंद होणार की सुरू राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेतकऱ्याच्या खात्यावर चाऱ्याचे पैसे जमा न करता त्याला थेट बांधावरती चारा कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच जनावरांसाठी चारा आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे यापूर्वी चारा छावण्यांवरून अनेक घोटाळे आणि वाद निर्माण झाले होते. हे वाद निर्माण होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर चारा पोहोचवण्यासाठी सरकारकडून हे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement