पंढरपुरात पूरस्थिती, प्रशासन गायब असल्याने नागरिक आक्रमक; भाविकांच्या मदतीलाही धावले कोळी बांधव
Pandharpur: परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पंढरपुरातील व्यास नारायण आणि अंबिका नगर मधील नागरिकांची झोप उडवली आहे. आज पहाटे चंद्रभागेचे पाणी काही घरात शिरल्याने नागरिकांना दिवाळीच्या तोंडावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
Pandharpur: परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पंढरपुरातील व्यास नारायण आणि अंबिका नगर मधील नागरिकांची झोप उडवली आहे. आज पहाटे चंद्रभागेचे पाणी काही घरात शिरल्याने नागरिकांना दिवाळीच्या तोंडावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. चंद्रभागा परिसरातील काही ठिकाणी पाणी शिरेल अशा सूचना प्रशासनाने दिल्या नसल्याचा संताप पूरग्रस्तांना बोलून दाखविल्याने प्रशासन कुठे गायब आहे, असे विचारायची वेळ आली आहे.
आज पहाटे व्यसनारायण भागातील 20 ते 25 घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने या भागातील अनेक कुटुंबाने रात्र जागून काढली. लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध पूरग्रस्तांना आपला प्रशासनावरील संताप बोलून दाखविला. या भागातील नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने या नागरिकांचे सामान काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केल्यावर प्रशासनाला जाग आली. मात्र पाणी वाढणार होते तर या भागातील लोकांना का हलवले नाही, अशी विचारणा पूरग्रस्त करीत आहेत. या सुस्त प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या संतप्त नागरिकांनी केली आहे. दिवाळीच्या तोंडावर आता या भागातील लोके उरलेले सामान घेऊन स्थलांतरित होऊ लागले आहेत. मात्र या पुराच्या पाण्याने या कुटुंबांचे संसार उपयोगी सामान भिजून खराब झाले आहे.
या पुराचा अंदाज चुकण्याचे कारण ठरले ते म्हणजे नाझरे धरणाचे पाणी. कऱ्हा नाडितीन आलेले हे पाणी सोनगाव येथे नीरा नदीला मिळाले आणि नंतर संगम येथे नीरा आणि भीमा नदीचा संगम झाल्याने आज सकाळी येथे 1 लाख 18 हजार क्युसेक निसर्गाने पाणी वाहत होते. त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. अशात विठुरायाच्या दर्शनाला येणारे शेकडो भाविक पाय धुण्यासाठी आणि स्नानासाठी चंद्रभागेवर गर्दी करीत आहेत. या पुराच्या वाहत्या पाण्यामुळे या भाविकांना धोका होऊ नये याची काळजी घेण्याचे काम प्रशासनाचे होते. पण इथेही प्रशासन झोपल्याचे दिसत होते. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून महाद्वार घाटावर येथील कोळी समाजाच्या तरुणांनी लोखंडी बॅरेगेट लावून घाट बंद केला आणि चंद्रभागेचे पाणी बदल्यात आणून भाविकांना घाटावरच पाय धुण्याची सोया करून दिली आहे. त्यामुळे या भाविकांना महाद्वार घाटावरच चंद्रभागेत पाय धुण्याचा आनंद घेता येत आहे. मात्र येथेही प्रशासन कुठे आहे, असे विचारायची वेळ येत आहे.
इतर महत्वाची बातमी:
Pune Rain : पुण्यात परतीच्या पावसाने घेतले दोघांचे प्राण; अनेकांचे नुकसान