एक्स्प्लोर
मराठवाड्यात मुसळधार पाऊस, 30 जण पुरात अडकले, बचावकार्य सुरु

लातूर: मराठवाड्यात मुसळधार पावसानं कहर केला आहे. मराठवाड्यात एकूण 30 लोकं पुरामुळं अडकली आहेत. लातूर जिल्ह्यातल्या रेणापुरात 12, अहमदपूरमध्ये 10 आणि नांदेडमध्ये 8 लोकं अडकले आहेत. तर जळकोट तालुक्यातील दोन गावांना खाली करण्यात आलं आहे. दरम्यान एनडीआरएफची टीम लातूर आणि नांदेडमध्ये पोहोचली आहे आणि बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या दोन्ही टीममध्ये 20-20 जवान, बोटी, स्विमर्स आणि ड्रायव्हर्सचा समावेश आहे. त्यामुळं अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आणखी वाचा























