अहमदनगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदरसह दहा जणांविरुद्ध बलात्कार, मारहाणीचा गुन्हा दाखल
अहमदनगरचे माजी महापौर आणि शिवनेचे स्थानिक नेते भगवान फुलसौंदर यांच्यासह 10 जणांवर बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौरांवरच असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने अहमदनगर शहरात एकाच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर : अहमदनगरचे माजी महापौर आणि शिवसेनेचे स्थानिक नेते भगवान फुलसौंदर यांच्यासह 10 जणांवर बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी समाजातील महिलेच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
अहमदनगर शहरातील बुरुडगाव येथे आदिवासी समाजातील पीडित महिला बकऱ्या चरण्यासाठी शेतात गेली होती. त्यावेळी भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोकांनी महिलेला अडवले आणि तिच्यासोबत असलेला जमिनीचा वाद मिटवायचा की नाही अशी विचारणा केली. यावरून झालेल्या बाचाबाचीनंतर या सर्वांनी तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रारही या महिलेने केली आहे. या तक्रारीवरून माजी महापौर भगवान फुलसौंदर, महेश फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौरांवर असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने अहमदनगर शहरात एकाच खळबळ उडाली आहे.