एक्स्प्लोर

Eknath Shinde: लेकासाठी बापाची धावाधाव, शिवसेना उबाठा पक्षाला धक्का; कल्याणमधील नेता शिंदेंच्या शिवसेनेत

श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: मतदारसंघात गाठीभेटी वाढवून विशेष लक्ष्य देऊन स्थानिक नेत्यांची मर्जी राखण्याचं काम सुरू केलं आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा उद्या शेवट होत आहे. त्यानंतर, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान (Voting) होत आहे. दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांची यादी जाहीर झाली असून कल्याणमधून (Kalyan Loksabha) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र पुन्हा एकदा लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे, कल्याण लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचे आव्हान असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, श्रीकांत शिंदे यांनीही शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: मतदारसंघात गाठीभेटी वाढवून विशेष लक्ष्य देऊन स्थानिक नेत्यांची मर्जी राखण्याचं काम सुरू केलं आहे. पुत्र श्रीकांत यांचा विजय सोपा करण्यासाठी मुख्यमंत्री धावपळ करताना दिसून येतात. त्यातच,  शिवसेना उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या पक्षप्रवेशामुळे श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला ताकद मिळाल्याचं दिसून येते.

राजकारणाच्या गदारोळात रोज काही ना काही घडताना दिसत आहे. त्यातच, कल्याणमध्ये मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी एकाच दिवसात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला आणि पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेते घरवापसी केली. मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो असताना आपला पक्षप्रवेश करून घेतला असल्याचा दावा पुरुषोत्तम चव्हाण यांनी यावेळी केला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी कल्याण ग्रामीणच्या उपजिल्हा प्रमुखांनाचा आपल्या गळाला लावलं आहे. त्यामुळे, येथील शिवसैनिकांची भूमिका काय राहिले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुरुषोत्तम चव्हाण यांनी एकाच दिवसात पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला होता. मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असल्याने मी वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी डोंबिवलीतील काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होता. त्यामध्ये माझा नंबर लागला. त्यावेळी माझ्या हातात पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षप्रवेश करून घेतला. मात्र, मलाही पक्षप्रवेशाबद्दल काही माहिती नव्हतं, असा गौप्यस्फोटही नगरसेवक चव्हाण यांनी केला होता.

वैशाली दरेकरांची टीका

दरम्यान, पुरूषोत्तम चव्हाण यांनी केलेल्या आरोपानंत कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, मुले पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळविणारी टोळी सध्या कल्याणमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावे.माजी नगरसेवक असलेल्या पुरुषोत्तम चव्हाण यांनी केलेल्या दाव्यानतंर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकीच्या लग्नाहून परताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
लेकीच्या लग्नाहून परताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Rajya Sabha :तापसणीदरम्यान आसन क्रमांक 222 खाली नोटांची बंडलं, राज्यसभा सभापतींची माहितीBharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादनABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 06 December 2024Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकीच्या लग्नाहून परताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
लेकीच्या लग्नाहून परताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
Embed widget