एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पात्र असून कर्जमाफीसाठी अर्ज न करता आलेल्या शेतकऱ्यांनाही संधी : मुख्यमंत्री
जवळपास 41 लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
नागपूर : कर्जमाफीला पात्र होते, मात्र त्यांना अर्ज करता आला नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देणार असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कर्जमाफीसाठी एकूण 77 लाख खात्यांचे अर्ज आले. डुप्लिकेशन करुन त्यापैकी 69 लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतले. त्यातून जवळपास 41 लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. शिवाय कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला देणार असल्याचं सांगून त्यांनी जिल्हानिहाय खातेदारांचीही आकडेवारी सादर केली.
शेतकरी कर्जमाफीची जिल्हानिहाय खाती (आतापर्यंत प्रोसेसिंग झालेली)
- अहमदनगर - 1.37 लाख
- अकोला - 1.06 लाख
- अमरावती - 1.30 लाख
- औरंगाबाद – 9 लाख 54 हजार
- बीड - 1.08 लाख
- बुलडाणा - 2.22 लाख
- चंद्रपूर - 68 हजार
- धुळे - 52 हजार
- हिंगोली - 56 हजार
- जळगाव - 1.42 लाख
- जालना - 1.40 लाख
- नागपूर - 57 हजार
- नांदेड - 1.19 लाख
- नाशिक - 1.30 लाख
- परभणी - 1.29 लाख
- पुणे - 82 हजार
- सांगली - 42 हजार
- सोलापूर - 1.36 लाख
- वर्धा - 65 हजार
- वाशिम – 79 हजार
- यवतमाळ - 1.69 लाख
- अकोला - 803 कोटी
- अमरावती – 906 कोटी
- बुलडाणा – 1500 कोटी
- औरंगाबाद – 537 कोटी
- बीड – 800 कोटी
- नांदेड - 1000 कोटी
- परभणी – 1000 कोटी
- यवतमाळ – 1000 कोटी
- जळगाव – 1000 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement