एक्स्प्लोर

राज्यातल्या सरपंचांची परीक्षा, उत्तीर्णांनाच चेक आणि सह्यांचा अधिकार

केंद्र सरकार पंचायत राजची दिशा ठरवण्याचा अभ्यासक्रम तयार करत आहे. या सरपंचांची परीक्षा घेण्यात येणार असून उत्तीर्ण सरपंचांना सह्यांचा अधिकार आणि चेक मिळणार आहे

अहमदनगर : जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयानंतर सरकारने आता त्यांना अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. कारण राज्यातील 7 हजार 300 सरपंचाना प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार पंचायत राजची दिशा ठरवण्याचा अभ्यासक्रम तयार करत आहे. या सरपंचांची परीक्षा घेण्यात येणार असून उत्तीर्ण सरपंचांना सह्यांचा अधिकार आणि चेक मिळणार असल्याचं, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितलं. अहमदनगरमधील गाव कारभारी परिषदेत पोपटराव पवार बोलत होते. नगर तालुका पत्रकार संघ आणि मार्केट यार्डच्या वतीने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पवार यांनी सरपंचाना प्रशिक्षण दिल्यास विकास कामं करण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळत असल्याने सरपंचाला महत्त्व आल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाणलोटसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचं सांगितलं. तसंच गेल्या 40 वर्षात पाणलोटसाठी 1300 कोटी मिळाले, मात्र तीन वर्षांत 5 हजार कोटी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढला असून मतदारांनी विकासकामांना महत्त्व देण्याचं अवाहन पोपटराव पवार यांनी केलं आहे. आमदाराच्या निवडणुकीसाठी पाच ते दहा कोटी आणि खासदाराच्या निवडणुकीसाठी 25 कोटी लागत आहेत. मात्र विकासाला महत्त्व न दिल्यास आणि 4 वाजेपर्यंत मतदार घराबाहेर पडला नाही तर विकासकामं कशी होतील, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget