एक्स्प्लोर
Advertisement
लाच प्रकरणी जाधवांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : खडसे
मुंबई : गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात तथ्य आढळल्यास मी स्वतः राजीनामा देईन, असं म्हणत खडसेंनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसल्याचा दावा करत तक्रारदार रमेश जाधवविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.
'गजानन पाटील 10-11 वर्ष रुग्णांना मदत करतो, तो शिकलेला नाही, माझ्याशी त्याने चर्चा केली नाही, मात्र तो मला बोलला असता तर मी सांगितलं असतं की इतकी जमीन देता येत नाही' अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली.
'मी नाथाभाऊ आहे, इतकी वर्ष राजकारणात आहे, एका फटक्यात मला नालायक ठरवण्याचा अधिकार नाही. जर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांत काहीही तथ्य असेल, तर मी एक मिनिटही पदावर राहणार नाही.' असं खडसे म्हणाले.
या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे ओएसडी उन्मेष महाजन यांचंही नाव येत आहे. जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोवर उन्मेष महाजन सेवेत राहतील, असं खडसेंनी म्हटलं आहे.
दुसरीकडे तक्रारकर्त्या डॉ. रमेश जाधव यांनीही खडसेंना आव्हान देत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. आपणही खडसेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं आहे.
काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.
ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.
संबंधित बातम्या
'लाचखोर गजानन पाटील तीन महिन्यांपासून ACB च्या रडारवर'
30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक
जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement