74 एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन जप्त, लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याद्वारे बँक ग्राहकांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांच्या सायबर सेलला यश मिळालं आहे.
बीड : एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याद्वारे बँक ग्राहकांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांच्या सायबर सेलला यश मिळालं आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी बीड पोलिसांनी पाळत ठेऊन सापळा रचून शिर्डीतून चार भामट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार्ड क्लोन करण्यासाठीची उपकरणांसह 7 लाख 15 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याद्वारे बँक ग्राहकांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे बीडच्या सायबर सेलच्या पोलिसांनी चार भामट्यावर पाळत ठेऊन त्यांना शिर्डी येथून अटक केली आहे.
चोरट्यांकडून कार्ड क्लोन करण्यासाठीच्या उपकरणांसह 7 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. 80 हजार रुपयाच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली आणि त्याच्याच आधारावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
बँकेचे व्यवहार करत असताना अनेकदा एटीएम कार्डचा वापर खातेधारकांकडून केला जातो. पण, कित्येकदा अशा प्रकारे फसवणूक करत याच एटीएम कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपये लंपासही केले जातात. हाच धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळं एटीएम कार्ड वारपताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.